Huawei Nova 3i cost leak ahead of official launch on 26 July: Huawei भारतात आपली नवीन Nova सीरीज भारतात येणार्या काही दिवसांमध्ये लॉन्च करणार आहे, या सीरीज मध्ये दोन नवीन स्मार्टफोंस कंपनी कडून Nova 3 आणि Nova 3i या नावाने 26 जुलै ला लॉन्च केले जाऊ शकतात. तुम्ही तर बघत असाल भारतात या डिवाइस बद्दल जय्यत तयारी सुरू आहे, पण एक बातमी वियतनाम वरून आली आहे, या बातमी मधून Nova 3i ची किंमत समजली आहे.
भारतात ही माहिती स्लॅशलीक च्या माध्यमातून समोर येत आहे, या माहिती मधून समोर येत आहे की हा डिवाइस भारता सोबत इतर अनेक देशांमध्ये पण लॉन्च केला जाणार आहे. या बातमी नुसार Huawei Nova 3i स्मार्टफोन VND 11,990,000 मधे म्हणजे जवळपास Rs 35,377 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे आपण आधीच Nova 3 चा लॉन्च बघितला आहे, हा डिवाइस कंपनी ने चीन मध्ये लॉन्च केला आहे, पण याची किंमत अजूनपर्यंत समजली नाही.
असे पण बोलले जात आहे की हे डिवाइस कंपनी कडून GPU Turbo टेक्निक सह लॉन्च केला जाणार आहे. असे झाल्यास हे देशातील पहिले स्मार्टफोन असतील ज्यात ही टेक्निक असेल. काही दिवसांपूर्वी अशी माहिती पण समोर आली होती की या स्मार्टफोंस मध्ये ही टेक्नोलॉजी असेल. त्याचबरोबर या स्मार्टफोंस मध्ये असेच खुप काही नवीन फीचर्स असतील. जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. असे पण बोलले जात आहे की हे डिवाइस कंपनी कडून अमेजॉन इंडिया एक्सक्लूसिव डिवाइस म्हणून लॉन्च केले जाऊ शकतात.
Nova 3 चे 64GB आणि 128GB स्टोरेज मॉडल क्रमश: 6GB रॅम सह येतील. अधिक स्टोरेज साठी यात एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण असेल. हा हँडसेट 3,650mAh बॅटरी सह येईल आणि एंड्रॉइड 8.1 Oreo OS वर आधारित EMUI सोबत येईल. तसेच बॅक पॅनल वर एक फिंगरप्रिंट रीडर देण्यात येईल आणि त्याचबरोबर असे पण समजले आहे की हा हँडसेट लाइट ब्लू, गोल्डन आणि पर्पल रंगांमध्ये येईल.
फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर, Nova 3 एक डुअल सेल्फी (dual selfie) कॅमेरा सेटअप देईल ज्यात 24 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सल चा सेकेंडरी सेंसर असेल आणि सोबतच Nova 3 च्या मागील डुअल कॅमेरा 16 मेगापिक्सल सेंसर आणि 24 मेगापिक्सल सेंसरचा आहे.