Huawei Nova 3, Nova 3i भारतात जुलै च्या शेवटी होतील लॉन्च, हा आहे GPU Turbo टेक्निक असलेला पहिला फोन
Nova 3 डिवाइस ला कंपनी 4 कॅमेरा सेटअप सह लॉन्च करू शकते, या डिवाइस मध्ये ड्यूल रियर आणि ड्यूल फ्रंट कॅमेरा असेल.
Huawei Nova 3 Smartphone to Launch in India in the end of July: जुलै च्या शेवटी Huawei एक नवीन सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या सीरीज ला Nova सीरीज नाव मिळू शकते. या सीरीज मध्ये कंपनी कडून दोन डिवाइस लॉन्च केले जाऊ शकतात, हे Nova 3 आणि Nova 3i नावाने लॉन्च केले जाणार असल्याची बातमी आहे. हे स्मार्टफोंस 17 जुलै ला चीन मध्ये सेल साठी येणार आहेत. त्यानंतर हे स्मार्टफोंस भारतात लवकरच लॉन्च केले जाऊ शकतात.
असे बोलले जात आहे की हा डिवाइस भारतात GPU Turbo टेक्निक सह लॉन्च केला जाऊ शकतो, याचा अर्थ असा की भारतात भारतात ही टेक्निक असलेला हा पहिला डिवाइस असेल.
Nova 3 चे 64GB आणि 128GB स्टोरेज मॉडल क्रमश: 6GB रॅम सह येतील. अधिक स्टोरेज साठी यात एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण असेल. हा हँडसेट 3,650mAh बॅटरी सह येईल आणि एंड्रॉइड 8.1 Oreo OS वर आधारित EMUI सोबत येईल. तसेच बॅक पॅनल वर एक फिंगरप्रिंट रीडर देण्यात येईल आणि त्याचबरोबर असे पण समजले आहे की हा हँडसेट लाइट ब्लू, गोल्डन आणि पर्पल रंगांमध्ये येईल.
फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर, Nova 3 एक डुअल सेल्फी (dual selfie) कॅमेरा सेटअप देईल ज्यात 24 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सल चा सेकेंडरी सेंसर असेल आणि सोबतच Nova 3 च्या मागील डुअल कॅमेरा 16 मेगापिक्सल सेंसर आणि 24 मेगापिक्सल सेंसरचा आहे. अजूनतरी या स्मार्टफोन ची किंमत समोर आली नाही. असा पण अंदाज लावला जात आहे की Huawei 18 जुलै ला Nova 3 स्मार्टफोन सोबत टॉकबँड बी5 स्मार्टबँड ची पण घोषणा करेल.
नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे!