गुगलने २०१५ मध्ये आपले दोन नवीन नेक्सस स्मार्टफोन हुआवे नेक्सस 6P आणि एलजी नेक्सस 5X बाजारात सादर केले होते. ब-याच महिन्यांपूर्वी हे स्मार्टफोन्स भारतात उपलब्ध झाले होते. मात्र आता अशी बातमी मिळत आहे की, हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोनवर २०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. ह्याआधी एलजी नेक्सस 5X च्या किंमतीमध्ये मोठी घट केली गेली होती.
आता ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर हुआवे नेक्सस 6P आकर्षक एक्सचेंज ऑफऱ दिली जात आहे. हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोनवर ५०० रुपयांपासून २०,००० पर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ही ऑफर केवळ फ्लिपकार्ट अॅपवर उपलब्ध आहे.
ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी ग्राहकांना आपल्या जुन्या मॉडलचा नंबर आणि IMEI नंबर टाकून पाहावे लागेल की, ह्या डिवाइसवर किती डिस्काउंट मिळत आहेत.
हुआवे नेक्सस 6P च्या 32GB व्हर्जनला भारतीय बाजारात ३९,९९० रुपयांत आणि 64GB व्हर्जनला ४३,९९९ रुपयांत सादर केले होते. दोन्ही मॉडल फ्लिपकार्टच्या ह्या एक्सचेंज ऑफर अंतर्गत उपलब्ध आहे.
हुआवे नेक्सस 6P च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे आणि ह्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 चे संरक्षण दिले गेले आहे. हा स्मार्टफोन 2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अॅपर्चर असलेला १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे, ज्याचे रिझोल्युशन 4k आहे आणि ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा पहिला पुर्ण मेटल स्मार्टफोन आहे, जो अॅल्युमिनियमने बनलेला आहे. त्याशिवाय ह्यात 3450mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात क्विक चार्ज फीचरसाठी सपोर्ट उपलब्ध आहे. ह्यामुळे केवळा १० मिनिटांत आपल्या फोनची बॅटरी ७ तासांपर्यंत चालेल. हा हँडसेट फॉर्स्ट व्हाइट, अॅल्युमिनियम आणि ग्रेफाइट रंगात उपलब्ध आहे.