HUAWEI Mate XT Ultimate: भारीच की! तीन वेळा फोल्ड होणारा जगातील पहिला फोन लाँच, Powerful फीचर्ससह दाखल
युनिक डिझाईनसोबत ट्रिपल फोल्डेबल फोन HUAWEI Mate XT Ultimate स्मार्टफोन लाँच
HUAWEI Mate XT Ultimate फोन हा जगातील पहिला ट्राय-फोल्ड स्क्रीन फोन आहे.
फोटोग्राफीसाठी या ट्रायफोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
आतापर्यंत आपण फोल्डेबल फोन्सबद्दल भरपूर ऐकले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, तीन वेळा फोल्ड होणाऱ्या स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा टेक विश्वात अनेक दिवसांपासून सुरु होती. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर HUAWEI Mate XT Ultimate स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. ‘हा जगातील पहिला ट्राय-फोल्ड स्क्रीन फोन आहे, जो सामान्य स्मार्टफोनसारखा फोल्ड होतो.’ युनिक डिझाईनसोबतच या ट्रिपल फोल्डेबल फोनमध्ये अनेक आकर्षक फीचर्स देखील देण्यात आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात HUAWEI Mate XT Ultimate ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: नवीनतम iPhone 16 सिरीजची भारतीय किंमत जाहीर, जाणून घ्या तुमच्या बजेटमध्ये बसतेय का किंमत?
HUAWEI Mate XT Ultimate ची किंमत
HUAWEI Mate XT Ultimate फोन स्मार्टफोन निर्माता कंपनीच्या होमटाऊन म्हणजेच चीनमध्ये लाँच झाला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 1,99,99 युआन म्हणजेच अंदाजे 2,35,910 रुपये आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, ही किंमत फोनच्या 16GB रॅम + 256GB स्टोरेजसाठी देण्यात आली आहे. हा फोन रेड आणि ब्लॅक कलर ऑप्शन्ससह लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये 20 सप्टेंबरपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.
HUAWEI Mate XT Ultimate चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
HUAWEI Mate XT Ultimate फोनमध्ये 6.4 इंच लांबीचा सिंगल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा 7.9 इंच लांबीचा आहे. तर, ट्रिपल स्क्रीनचा आकार संपूर्ण 10.2 इंच लांबीचा आहे. कंपनीने अद्याप फोनच्या प्रोसेसरशी संबंधित तपशील अद्याप उघड केलेला नाही. या स्मार्टफोनचे डायमेंशन 156.7 x 73.5 सिंगल/ 143 मिमी ड्युअल/ 219 मिमी ट्रिपल x अशाप्रकारे आहेत. सुरक्षेसाठी, या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन तीन स्टोरेजमध्ये येतो. ज्यामध्ये 256GB, 512GB आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्पेस शक्तिशाली 16GB रॅमसह प्रदान करण्यात आली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ब्रँडने अद्याप चिपसेटबद्दल माहिती दिलेली नाही परंतु, ते Kirin 9000 असण्याची शक्यता आहे.
फोटोग्राफीसाठी या ट्रायफोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP पेरिस्कोप सेन्सर उपलब्ध आहे. हा सेन्सर OIS सपोर्टसह येतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 5600mAh बॅटरी आहे, जी 66W फास्ट चार्जिंगसह येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile