Huawei Mate 9 आणि Mate 9 Pro ला मिळाला नवीन फेस अनलॉक फीचर
या अपडेट ची साइज 514MB आहे आणि हा लेटेस्ट मे 2018 च्या एंड्राइड सिक्योरिटी पॅच सह येतो.
Huawei ने आता Mate 9 आणि Mate 9 Pro स्मार्टफोन्स साठी नवीन EMUI 8.0 अपडेट रिलीज केला होता, ज्यात डिवाइस ला अनेक नवीन फीचर्स मिळाले होते. या अपडेट चा वर्जन नंबर 8.0.0.356 आहे आणि हा दोन्ही स्मार्टफोन्स साठी फेस अनलॉक फीचर घेऊन येतो.
फेस अनलॉक फीचर व्यतिरिक्त या अपडेट मध्ये काही जेस्चर आधारित कंट्रोल्स पण आहेत. या अपडेट मध्ये डिवाइस गेमिंग असिस्टेंट पण मिळाला आहे. नवीन फीचर्स बरोबर अपडेट मध्ये बग फिक्स पण आहेत, ज्यात WeChat मेसेजेस चे डिले रिसेप्शन पण एक आहे.
या अपडेट मध्ये अनेक अॅप्स साठी नवीन आइकॉन्स पण सामील करण्यात आले आहेत, त्याचबरोबर या अपडेट ची साइज 514MB आहे आणि हा लेटेस्ट मे 2018 च्या एंड्राइड सिक्योरिटी पॅच सह येतो. कंपनी नुसार हा नवीन अपडेट Mate 9 फुल नेटकॉम एडिशन MHA-AL00, Mate 9 नेटकॉम मोबाईल कस्टमाईज एडिशन MHA-TL00 आणि Mate 9 Pro फुल नेटकॉम एडिशन LON-AL00, Porsche डिजाइन एडिशन साठी जारी करण्यात आला आहे.
जवळपास 6 महिन्या पुर्वी Huawei ने Mate 9 सीरीज साठी EMUI 8.0 अपडेट जारी केला गेला होता ज्यात कंपनी च्या जुन्या फ्लॅगशिप डिवाइसना एंड्राइड ओरियो ऑपरेटिंग सिस्टम अपडेट मिळाला होता. या अपडेट मध्ये डिवाइस ला अनेक नवीन फीचर्स मिळाले होते ज्यात AI एक्सपीरियंस, स्मार्ट स्प्लिट स्क्रीन इत्यादींचा समावेश आहे.
Huawei Mate 9 मध्ये 5.9 इंचाचा फुल HD डिस्प्ले आहे ज्याला गोरिला ग्लास 3 द्वारा प्रोटेक्शन देण्यात आले आहे, तर Mate 9 Pro डिवाइस मध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचे रेजोल्यूशन 1440 x 1080 पिक्सल आहे आणि याला पण गोरिला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. दोन्ही स्मार्टफोन्स कंपनी च्या HiSilicon किरिन 960 ओक्टा-कोर प्रोसेसर वर चालतात. Mate 9 मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे, तर Pro एडिशन मध्ये 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज आहे.