ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये ६ इंचाची डिस्प्ले असू शकते, त्याचबरोबर ह्याच्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1440 पिक्सेल असू शकतो. ह्याला किरीन 950 चिपसेटवर सादर केला जाईल.
मोबाईल निर्माता कंपनी हुआवे आपला नवीन स्मार्टफोन मॅट8 ला २६ नोव्हेंबरला लाँच करेल अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे. खरे पाहता, २६ नोव्हेंबरला कंपनीने एका मीडिया कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, ज्यासाठी कंपनीने निमंत्रण पाठवायला सुरुवात केली आहे. असे सांगितले जातय की, कंपनी सध्यातरी आपल्या ह्या स्मार्टफोनला केवळ चीनच्या बाजारात लाँच करेल.
कंपनीने आपल्या निमंत्रणात मोठा ८ आकडा लिहून त्याबाबत माहिती दिली आहे. आम्हाला आशा आहे की, ह्या दिवशी हुआवे मॅट 8 लाँच केला जाऊ शकतो. ह्या फोनविषयी याआधीही बरीच माहिती मिळाली आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये ६ इंचाची डिस्प्ले असू शकते. त्याचबरोबर ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन १४४० पिक्सेल असू शकते. ह्याला किरीन 950 चिपसेटवर सादर केला जाईल. त्याशिवाय ह्याला 3GB आणि 4GB रॅम मेमरीसह सादर केला जाईल. ह्या फोनमध्ये 32GB आणि 64GB अंतर्गत मेमरी असण्याची शक्यता आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असण्याची शक्यता वर्तवली जातेय.