मोबाईल निर्माता कंपनी हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन मॅट 8 लाँच केला आहे. सध्यातरी हया स्मार्टफोनला चीनमध्ये सादर केले आहे, मात्र आशा आहे की, जानेवारी 2016 मध्ये हा इतर देशांमध्येसुद्धा उपलब्ध केला जाईल. ह्याची किंमत 480 डॉलर (जवळपास ३२,००० रुपये) पासून सुरु होईल.
हुआवे मॅट 8 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ६ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. स्क्रीन गोरिल्ला ग्लास 4 कोटेड आहे. त्याचबरोबर ह्यात 3GB रॅम/32GB अंतर्गत स्टोरेज, 4GB रॅम/64GB अंतर्गत स्टोरेज आणि 4GB रॅम/128GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. मॅट 8 चे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह नवीन चिपसेट किरीन 950वर सादर केला आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात 4000mAh बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE, ब्लूटुथ, वायफाय, GPS आणि मायक्रो-USB फीचर्स आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ६.० मार्शमॅलोवर चालतो.