Huawei च्या या स्मार्टफोनला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, आतापर्यंत 1 मिलियन लोकांनी केले बुकिंग, जाणून घ्या विशेषता

Huawei च्या या स्मार्टफोनला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, आतापर्यंत 1 मिलियन लोकांनी केले बुकिंग, जाणून घ्या विशेषता
HIGHLIGHTS

Huawei Mate 50 सीरिजच्या स्मार्टफोन्सना मिळतोय उत्तम प्रतिसाद

10 लाखांहून अधिक लोकांनी या फोनसाठी रिजर्वेशन केले

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा उपलब्ध

जेव्हापासून अमेरिकेने Huawei विरुद्ध निर्बंध लादले आहेत, तेव्हापासून कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीत मोठी घसरण होत होती. पण आता असे दिसत आहे की, हा ब्रँड स्मार्टफोन मार्केटमध्ये कमबॅक करत आहे. कंपनीच्या Mate 50 सीरिजच्या स्मार्टफोन्सना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हे सुद्धा वाचा : स्वस्त बजेटमध्ये नवीन फोन घेण्यापूर्वी 'हे' पर्याय नक्की पहा, उत्तम कॅमेरा, हार्डवेअर डिझाइन सर्वच अप्रतिम

Huawei Mate 50 सिरीज स्मार्टफोन 6 सप्टेंबर 2022 रोजी चीनमध्ये 4 व्हेरिएंटमध्ये लॉन्च करणार आहे. पण लॉन्च होण्यापूर्वीच ब्रँडने चीनमधील Mate 50 लाइनअपसाठी त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून रिजर्वेशन सुरू केले होते. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी या फोनसाठी रिजर्वेशन केले आहे. 

 Huawei च्या फोनमध्ये Qualcomm चे नवीनतम Snapdragon 8+ Gen 1 SoCs वापरले गेले आहे. केवळ 4G स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर Huawei च्या फ्लॅगशिप Mate 50 सिरीजला देखील पावर देईल.

Huawei Mate 50 चे संभाव्य स्पेसीफिकेशन्स 

 Huawei Mate 50 5G स्मार्टफोन 1080 x 2376 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह 6.5-इंचा लांबीच्या इमर्सिव्ह डिस्प्लेसह येण्याची अपेक्षा आहे. Huawei Mate 50 स्मार्टफोन Kirin 9000S द्वारे समर्थित असू शकतो, जो 8GB RAM सह जोडला जाईल. तसेच, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी, स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असू शकतो, ज्यामध्ये मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेल असू शकतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo