Huawei Mate 20: टीजर लीक, ट्रिपल कॅमेरा सह होऊ शकतो लॉन्च

Updated on 19-Sep-2018
HIGHLIGHTS

हुवावे मेट 20 डिवाइस बद्दल एक टीजर असे दाखवत आहे की या फोन मध्ये एक ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येईल, तसेच हा कॅमेरा सेटअप एक स्क्वेयर मध्ये असेल, अशी पण माहिती मिळाली आहे. तसे पाहता या फोन बद्दल अनेकदा लीक समोर आले आहेत.

Huawei आपल्या स्मार्टफोन्स मुळे नेहमीच चर्चेत असते. यावर्षी पण अशीच स्थिती होती, हुवावे आपल्या स्मार्टफोन्स मुळे चर्चेत होती. ही कंपनी आपल्या स्मार्टफोन्स मुळे चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे ही कंपनी काही इनोवेटिव स्मार्टफोन्स ची निर्मिती करत आहे, त्यामुळे ही कंपनी चर्चेत आहे. आज आपण Huawei Mate 20 स्मार्टफोन बद्दल बोलत आहोत, या बद्दल भरपूर लीक आणि रुमर्स समोर आले आहेत. असे बोलेल जात आहे की Huawei Mate 20 ( हुवावे मेट 20) 16 ऑक्टोबरला लॉन्च केला जाऊ शकतो. या डिवाइस बद्दल अनेक लीक आधीच आले आहेत, त्यामुळे आपल्याला Huawei Mate 20 बद्दल बरीचशी माहिती आहे.
Huawei Mate 20 या वर्षीचा सर्वोत्तम स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे, तसेच हा बहुप्रतीक्षित असल्यामुळे खुप चर्चेत आहे, आता जो स्मार्टफोन आपल्या लॉन्चच्या आधीच चर्चेत आहे त्याच्याविषयी यूजर्सची उत्सुकता पण तेवढीच असणार आहे. या हुवावे मेट 20 बद्दल तसे तर भरपूर लीक आणि रुमर्स समोर आले आहेत पण कंपनी ने अधिकृतपणे या संबंधीत कोणतीही माहिती दिली नाही.
Huawei Mate 20 चा एक नवीन टीजर समोर येत आहे जो या डिवाइस मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असल्याचे सांगत आहे. त्याचबरोबर अशी पण माहिती समोर येत आहे की हा कॅमेरा सेटअप एका स्क्वेयर मध्ये असतील. इथे तुम्ही हा टीजर बघू शकता.

Huawei Mate 20 रुमर्ड स्पेसिफिकेशन

Mate 20 आणि Mate 20 Pro मध्ये लेटेस्ट किरिन 980 SoC असेल जो कंपनीचा पहिला 7nm SoC आहे, जो कंपनी ने बर्लिन मध्ये आयोजित IFA 2018 मध्ये सादर केला होता. Mate 20 Lite बद्दल बोलायचे झाले तर हा कंपनी ने काही दिवसांपूर्वी यूनाइटेड किंगडम मध्ये लॉन्च केला आहे आणि नुकताच हा डिवाइस Maimang 7 नावाने चीन मध्ये सादर करण्यात आला होता. अनेक लीक्स आणि रुमर्स मुळे डिवाइसेजच्या डिजाइन बद्दल भरपूर माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी Mate 20 आणि Mate 20 Pro चे अनेक रेंडर्स ऑनलाइन दिसले होते, ज्यावरून संकेत मिळाले आहेत की Huawei Mate 20 Pro एका यूनीक ट्रिपल कॅमेरा सिस्टम सह येईल जो 2×2 मॅट्रिक्स च्या फॉर्म मध्ये अरेंज केलेला असेल. Mate 20 पाहता डिवाइस मध्ये वर्टिकल ट्रिपल कॅमेरा सिस्टम असू शकते. दोन कॅमेरा एकाच ही बाउंड्री मध्ये ठेवले जातील तर तिसर्‍या कॅमेर्‍याला वेगळी जागा देण्यात येईल. 

स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असेल आणि ते एंड्राइड 9.0 पाई सह हुवावे च्या लेटेस्ट EMUI 9.0 UI वर चालतील. 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :