Huawei Mate 20 Pro मध्ये असू शकतो 6.9 इंचाचा OLED पॅनल

Updated on 13-Jun-2018
HIGHLIGHTS

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी मोठया साइज चे OLED पॅनेल्स आपल्या फोन Huawei Mate 20 Pro मध्ये सामील करू इच्छित आहे जो यावर्षीच्या शेवटच्या तिमाहीत किंवा 2019 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाईल.

जगातील तिसरी मोठी स्मार्टफोन कंपनी Huawei आता पर्यंतच्या सर्वात मोठ्या स्क्रीन साइज सह प्रीमियम फोन्स तयार करत आहे, साउथ कोरियन पब्लिकेशन The Bell ने दावा करून ही माहिती दिली आहे. रिपोर्ट वरून समजले आहे की कंपनी ने Samsung डिस्प्ले कडे 6.9 इंचाच्या OLED पॅनल ची ऑर्डर दिली आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी मोठया साइज चे OLED पॅनेल्स आपल्या फोन Huawei Mate 20 Pro मध्ये सामील करू इच्छित आहे जो यावर्षीच्या शेवटच्या तिमाहीत किंवा 2019 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाईल. 

सोर्स नुसार Samsung डिस्प्ले सध्या Huawei ला 6.9 इंचाचे OLED पॅनेल्स सँपल्स उपलब्ध करून देत आहे. अशा आहे की OLED स्क्रीन्स ची संपूर्ण सप्लाई तिसर्‍या तिमाही पर्यंत पूर्ण होईल. 

मागच्या वर्षी, Huawei ने 16 ऑक्टोबरला जर्मनी मध्ये Huawei Mate 10 आणि Mate 10 Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले होते. सप्लाई चा वेळ पाहता समजते की कंपनी या OLED पॅनेल्सना Huawei Mate 20 आणि Mate 20 Pro स्मार्टफोंस मध्ये वापरू शकते, जे या वर्षीच्या शेवटी लॉन्च केले जाऊ शकतात. Mate 20 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले असू शकतो तर P20 Pro मध्ये 6.9 इंचाचा मोठा डिस्प्ले असू शकतो. 

रुमर्स नुसार, Samsung Galaxy Note 9 मध्ये 6.38 इंचाची OLED स्क्रीन सादर केली जाऊ शकते तर आगामी iPhones मध्ये 6.46 इंचाचा OLED डिस्प्ले असेल. Huawei आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी 6.9 इंचाचा Mate 20 Pro लॉन्च करेल. 

Mate 20 फोन ची AnTuTu लिस्टिंग एप्रिल मध्ये समोर आली होती. लिस्टिंग वरून खुलासा झाला होता कि किरिन 980 चिपसेट द्वारा संचालित Mate 20 स्मार्टफोन ला बेंचमार्किंग प्लॅटफार्म वर 350,000+ पेक्षा जास्त स्कोर मिळाला आहे. त्यामुळे या शक्‍यता पण वाढल्या आहेत की Mate 20 आणि Mate 20 Pro स्मार्टफोंस किरिन 980 SoC द्वारा संचालित असतील. मागच्या महिन्याच्या रिपोर्ट नुसार हा एक 7nm चिपसेट असेल ज्याप्रमाणे 2018 iPhones मधील Apple A12 SoC आहे. 

Huawei Mate RS फोन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह लॉन्च करण्यात आला आहे त्यामुळे आता रुमर्स येत आहे की Mate 20 ला एडवांस बायोमेट्रिक रिकोग्निशन फीचर दिला जाऊ शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :