Huawei Mate 10 सीरीज मध्ये आला नाईट मोड, जाणून घ्या याचा उपयोग

Huawei Mate 10 सीरीज मध्ये आला नाईट मोड, जाणून घ्या याचा उपयोग
HIGHLIGHTS

Huawei Mate 10 ला Huawei P20 आणि Huawei P20 Pro चा एक फीचर मिळाला आहे, आता हा फीचर तुम्हाला या सीरीज च्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये येणार आहे.

Huawei P20 आणि Huawei P20 Pro स्मार्टफोन्स कंपनी ने या वर्षीच्या सुरवातीला लॉन्च केले होते. या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये आपण ड्यूल आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप बघितला होता. त्याचबरोबर सर्वात खास फीचर म्हणजे नाईट मोड पण यात होता. जो काही शटर मोड्स चा वापर फोटो कॅप्चर करण्यासाठी करतो.

आता पर्यंत हा फीचर फक्त Huawei P20 आणि Huawei P20 Pro स्मार्टफोन्स मध्ये होता, म्हणजे हा तुम्हाला याच स्मार्टफोन्स मध्ये मिळत होता. पण आता तुम्ही हा फीचर कंपनी च्या Mate सीरीज मध्ये पण वापरू शकता. याचा अर्थ असा की कंपनी ने हा आपल्या अजून एका सीरीज मध्ये पण दिला आहे. आता तुम्हाला हा फीचर Huawei Mate 10, Mate 10 Pro आणि Porsche Design Mate 10 वर पण एका सॉफ्टवेयर अपडेट च्या माध्यमातून देण्यात आला आहे. Huawei ची मेट 10 सीरीज एंड्राइड 8.0 Oreo वर चालते. 

Huawei Mate 10 आणि Mate 10 Pro स्पेसिफिकेशन्स
Mate 10 आणि Mate 10 Pro थिनर टॉप आणि बॉटम बेजल्स सोबत नवीन डिजाइन लँग्वेज वापरतो. Mate 10 मध्ये 5.9 इंचाचा क्वॉड HD LCD डिस्प्ले आहे जो 16:9 चा एस्पेक्ट रेश्यो ऑफर करतो तर Mate 10 Pro मध्ये 6 इंचाचा OLED डिस्प्ले आहे जो 2160 x 1080 चा फुल HD+ रेजोल्यूशन ऑफर करतो आणि 18:9 के एस्पेक्ट रेश्यो सह येतो. स्टोरेज साठी Mate 10 मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे आणि Mate 10 Pro मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे.

Mate 10 आणि Mate 10 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एक 12MP चा RGB कलर सेंसर आणि दूसरा 20MP चा मोनोक्रोम सेंसर आहे. LG V30 नंतर Mate 10 पहिला असा फोन आहे जो f/1.6 के वाइडर अपर्चर च्या इमेज सेंसर सह येतो. याचा प्राइमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सोबत लेजर ऑटोफोकस आणि फेस डिटेक्शन ऑटोफोकस ऑफर करतो. दोन्ही डिवाइसेज मध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

Huawei Mate 10 मध्ये फ्रंट-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे तर Mate 10 Pro मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. हे हँडसेट एंड्राइड 8.0 ओरियो वर आधारित EMUI 8.0 वर चालतात आणि यात 4000mAh ची बॅटरी आहे. Huawei Mate 10 आणि Mate 10 Pro IP53 आणि IP67 वॉटर आणि डस्ट रसिस्टेंट आहेत. Huawei ने सोबतच Porsche डिजाइन Mate 10 Pro पण लॉन्च केला आहे ज्यात सिरामिक फिनिश सह 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. हे तिन्ही मॉडेल्स नवीन स्मार्ट स्क्रीन मिररिंग फंक्शन ला सपोर्ट करतात ज्यामुळे यूजर्स आपला फोन HDMI केबल द्वारा PC सोबत कनेक्ट करू शकतात. हे फंक्शन Samsung च्या DeX सारखेच आहे पण यात डॉक ची गरज नाही.

Huawei चे म्हणणे आहे की Mate 10 सीरीज नवीन TUV सेफ्टी सर्टिफाइड सुपरचार्ज फंक्शन ला सपोर्ट करते ज्यामुळे 30 मिनिटांत फोन 58 टक्के चार्ज होऊ शकतो. Huawei Mate 10, Mate 10 Pro आणि Porsche Edition ची किंमत क्रमशः €699, €799 और €1395 आहे.

नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo