मोबाईल निर्माता कंपनी हुआवेने CES 2016 मध्ये आपला नवीन स्मार्टफोन GX8 लाँच केला आहे. हुआवेने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत 349 डॉलर (जवळपास २३,२०० रुपये) ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन 2016 च्या पहिल्या तीन महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
हुआवे GX8 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, कंपनीने ह्याला मेटल बॉडीसह लाँच केला आहे. सुरक्षेसाठी ह्यात फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे, जो प्रायमरी कॅमे-याच्या बरोबर खाली दिला गेला आहे.
हुआवे GX8 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन क्वालकॉम 615 64-बिट्स ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, ब्लूटुथ, वायफाय आणि GPS फीचर्ससुद्धा आहे. हा स्मार्टफोन 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.