हुआवे G9 लाइट स्मार्टफोन आणि मिडियापॅड M2 7.0 टॅबलेट लाँच
G9 लाइटमध्ये 5.2 इंचाची 1080 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. हा फोन किरिन 650 चिपसेट, 2.0GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी हुआवे बाजारात आपला नवीन फोन G9 लाइट आणि नवीन टॅबलेट मिडियापॅड M2 7.0 लाँच केला आहे. सध्यातरी कंपनीने आपल्या ह्या दोन्ही डिवायसेसला चीनमध्ये लाँच केले आहे. हुआवे P9 लाइट चीनमध्ये G9 लाइट असे नाव दिले आहे. G9 लाइटमध्ये 5.2 इंचाची 1080 पिक्सेल असलेली डिस्प्ले दिली गेली आहे. हा फोन किरिन 650 चिपसेट, 2.0GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या डिवाइसमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवता येऊ शकते.
हुआवे G9 लाइट स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक फिंगरप्रिंट सेंसर दिले गेले आहे. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा फो फास्ट चार्जिंगसह येणार की नाही ह्या विषयी सध्यातरी काही माहिती मिळालेली नाही.
मिडियापॅड M2 10.1 इंच आणि 8.0 इंच डिस्प्ले पर्यायात उपलब्ध आहे, मात्र आता ह्या डिवाइसला ७.० इंचाच्या डिस्प्ले लाँच केले गेले आहे. मिडियापॅड M2 7.0 फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. ह्याच्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080 पिक्सेल आहे.
हेदेखील पाहा – लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक
ह्यात 4360mAh ची बॅटरी दिली गेली आहे आणि हा स्नॅपड्रॅगन 615 चिपसेटसह लाँच केला गेला आहे. हा 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. तसेच ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
हुआवे G9 लाइटची किंमत $260 (CNY 1699) ठेवली आहे आणि हा पांढरा, सोनेरी आणि काळ्या रंगात उपलब्ध होईल. मिडियापॅड M2 7.0 च्या 16GB च्या व्हर्जनची किंमत $245(CNY 1599) आहे आणि ह्यात 32GB व्हर्जनची किंमत $276 (CNY 1799) आहे.
हेदेखील वाचा – सोनी SRS-XB3 वायरलेस स्पीकर लाँच, किंमत १२,९९० रुपये
हेदेखील वाचा – लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाओमीने बनविली “बनी” स्मार्टफोन