हुआवेने सादर केला एन्जॉय ५ स्मार्टफोन

हुआवेने सादर केला एन्जॉय ५ स्मार्टफोन
HIGHLIGHTS

ह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे ज्याचे रिझोल्युशन ७२०x१२८० आहे. त्यासोबत ही डिस्प्ले २९४ppi ची पिक्सेल तीव्रता आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक MT6735 चिपसेट, क्वाड-कोर प्रोसेसर, मेल-T720 GPU आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे.

मोबाईल निर्माता कंपनी हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन एन्जॉय५ प्रदर्शित केला आहे. हा स्मार्टफोन १६ ऑक्टोबरला चीनमध्ये लाँच केला जाईल. असे सांगितले जातेय की, ह्या स्मार्टफोनची किंमत १५८ डॉलरच्या जवळपास असू शकते. ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ७२०x१२८० आहे. त्याचबरोबर हा डिस्प्ले २९४ppi ची पिक्सेल तीव्रता देतो. हा स्मार्टफोन मीडियाटेक MT6735 चिपसेट, क्वाड-कोर प्रोसेसर, मेल-T720 GPU आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे. त्यासोबतच ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डने १२८जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

 

तसेच ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात ४०००mAh ची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे. ह्यात अॅनड्रॉईड ५.१ प्री-इन्स्टॉल्ड मिळेल.

त्याशिवाय, हा स्मार्टफोन ड्युल-सिम आणि 4G LTE, वाय-फाय, ब्लटुथ ४.० आणि GPS कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनचे वजन १६० ग्रॅम आहे आणि ह्याची जाडी ९.७एमएम आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo