HTC आपल्या 2018 चा फ्लॅगशिप स्मार्टफोनला आज लॉन्च करण्यास पूर्णपणे तयार आहे. हा डिवाइस आज एका इवेंट मधुन तैवान मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. याचा लॉन्च जवळ येताच या डिवाइस बद्दल आणि याच्या किंमत, स्पेक्स आणि फीचर्स बद्दल माहिती समोर आली आहे. ही माहिती एक लीक रेंडर वरून समोर आली आहे. पण एवढेच नाही तर या डिवाइस बद्दल कंपनी ने अचानक काल काही माहिती प्रकाशित केली होती. परंतु कंपनी ने हे पेज नंतर काढून टाकले.
हा डिवाइस एका डच साइट MobielKopen वर दिसला होता, यानुसार या डिवाइस चा मॉडेल नंबर 2Q55100 आहे. त्याचबरोबर हा गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 2407 आणि मल्टीकोर मध्ये 8894 पॉइंट्स मिळाले होते. हा डिवाइस तिथे स्नॅपड्रॅगन 845 ओक्टा-कोर प्रोसेसर सह दिसला होता. तसेच यात 6GB रॅम पण आहे, हा डिवाइस एंड्राइड Oreo सह लॉन्च होईल.
विशेष म्हणजे या डिवाइस च्या बाबतीत काही माहिती आधी पण समोर आली आहे. या डिवाइस बद्दल समोर आलेल्या माहिती मध्ये याच्या स्पेक्स व्यतिरिक्त याची किंमत पण समोर आली आहे. HTC U12 मध्ये 6 इंचाचा QHD डिस्प्ले असेल आणि या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 645 प्रोसेसर आणि 6GB रॅम असेल. डिवाइस मध्ये डुअल फ्रंट आणि रियर कॅमेरा असेल आणि हा डिवाइस एंड्राइड ओरियो वर चालेल तसेच IP68 सर्टिफाइड असेल.
मागील लीक्स नुसार HTC U12+ मध्ये फोन ची स्टोरेज वाढवण्यासाठी तुम्हाला एक वेगळा माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण देण्यात आला आहे. त्याचबरोबर HTC असे पण बोलत आहे की या डिवाइस च्या निर्मिती मध्ये वेगळ्या मटेरियल्स चा वापर करण्यात येणार आहे. फोन मध्ये एक 3,420mAh क्षमता असलेली बॅटरी असेल.
लॉन्च च्या आधीच HTC U12+ च्या किंमती बद्दल लीक समोर आला आहे. पण आता डिवाइस ची तैवानी किंमत समजली आहे ज्यावरून अंदाज लावता येईल की इतर बाजारांमध्ये हा फोन कोणत्या किंमतीत येईल. HTC U12+ दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल, याच्या एक वेरिएंट मध्ये 64GB आणि दुसर्या वेरिएंट मध्ये 128GB स्टोरेज असेल. 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत NTD21,900 (~$736) आणि NTD22,900 ($769) दरम्यान असेल आणि128GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत NTD23,900 ($803) ते NTD24,900 ($837) पर्यंत असेल.