HTC U12+ च्या किंमतीचा झाला खुलासा

HTC U12+ च्या किंमतीचा झाला खुलासा
HIGHLIGHTS

HTC 23 मे ला आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, शक्‍यता आहे की हा फोन HTC U12+ नावाने समोर येईल.

मे असा महिना आहे ज्यात काही फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लॉन्च झाले आहेत किंवा काही लॉन्च होणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला LG ने आपला LG G7 ThinQ डिवाइस लॉन्च केला होता. तसेच OnePlus आणि Honor पण आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन्स या महिन्यात लॉन्च करणार आहे. एकीकडे 15 आणि 16 मे ला हॉनर आणि OnePlus आपले दोन नवीन फ्लॅगशिप डिवाइस क्रमश: लॉन्च करतील. तर दुसरीकडे या लिस्ट मध्ये HTC पण सामिल होणार आहे. HTC 23 मे ला आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शक्‍यता आहे की हा फोन HTC U12\+ नावाने समोर येईल. हा एक फ्लॅगशिप डिवाइस असेल आणि जर तुम्ही या डिवाइस ची किंमत जाणून घेऊ इच्छित असाल तर हे आर्टिकल तुम्हाला उपयोगी ठरेल. 

किंमत 
लॉन्च च्या आधीच HTC U12+ च्या किंमती बद्दल लीक समोर आला आहे. पण आता डिवाइस ची तैवानी किंमत समजली आहे ज्यावरून अंदाज लावता येईल की इतर बाजारांमध्ये हा phon कोणत्या किंमतीवर येईल. HTC U12+ दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल, याच्या एक वेरिएंट मध्ये 64GB आणि दुसर्‍या वेरिएंट मध्ये 128GB स्टोरेज असेल. 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत NTD21,900 (~$736) आणि NTD22,900 ($769) दरम्यान असेल आणि128GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत NTD23,900 ($803) ते NTD24,900 ($837) पर्यंत असेल. 

हे स्पेसिफिकेशन्स असतील यात 
HTC U12 मध्ये 6 इंचाचा QHD डिस्प्ले असेल आणि या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 645 प्रोसेसर आणि 6GB रॅम असेल. डिवाइस मध्ये डुअल फ्रंट आणि रियर कॅमेरा असेल आणि हा डिवाइस एंड्राइड ओरियो वर चालेल तसेच IP68 सर्टिफाइड असेल. मागील लीक्स नुसार HTC U12+ मध्ये फोन ची स्टोरेज वाढवण्यासाठी तुम्हाला एक वेगळा माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण देण्यात आला आहे. त्याचबरोबर HTC असे पण बोलत आहे की या डिवाइस च्या निर्मिती मध्ये वेगळ्या मटेरियल्स चा वापर करण्यात येणार आहे. फोन मध्ये एक 3,420mAh क्षमता असलेली बॅटरी असेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo