HTC U12 च्या बाबतीत समोर आला नवीन लीक, ड्यूल हॉरिजॉन्टल कॅमेरा असू शकतो यात

Updated on 09-Apr-2018
HIGHLIGHTS

iPhone X प्रमाणे नॉच डिजाईन विना लॉन्च केला जाणार आहे HTC U12 स्मार्टफोन.

रोज समोर येत आहे की कोणती ना कोणती कंपनी आपला आगामी स्मार्टफोंस एका नॉच डिस्प्ले सह लॉन्च करणार आहे. आताच समोर आले आहे की OnePlus 6 स्मार्टफोन पण या फीचर सह लॉन्च केला जाऊ शकतो. पण एक नवीन माहिती असे सांगत आहे की HTC या प्रकारचा डिस्प्ले आपल्या आगामी स्मार्टफोन मध्ये वापरणार नाही.  

एका नवीन लीक नुसार, HTC U12 स्मार्टफोन मध्ये हा फीचर असणार नाही, कंपनी आपल्या पारंपरिक डिजाईन सह हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते. नवीन लीक वरून समोर येत आहे की हा स्मार्टफोन एका बेजल-लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाणार आहे, पण यात iPhone X प्रमाणे कोणताही नॉच असणार नाही.  

जर असे झाले तर असे म्हटले जाऊ शकते की हा स्मार्टफोन iPhone X च्या श्रेणीत येणार नाही. याव्यतिरिक्त जसे की आपण U11 Plus स्मार्टफोन मध्ये पहिले होते, या डिवाइस मध्ये पण तुम्हाला ग्लास बॅक मिळू शकते. पण तरीही या दोन्ही स्मार्टफोंस मध्ये खुप फरक असणार आहे. जसे की तुम्ही फोटो मध्ये बघू शकता की याच्या बॅक वर एक ड्यूल कॅमेरा सेटअप दिसत आहे तसेच याच्या खाली तुम्हाला एक सर्कुलर फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. 
इथे हे पण समोर येत आहे की स्मार्टफोन च्या डिस्प्ले मध्ये फिंगरप्रिंट सेंसर ठेवण्यात आला नाही. अशा प्रकारचा फिंगरप्रिंट सेंसर काही दिवसांपूर्वी आपण Vivo X21 UD आणि Huawei Mate RS मध्ये बघितला होता. याव्यतिरिक्त तुम्हाला सांगायचे झाले तर HTC U12 स्मार्टफोन मध्ये एक 5.5-इंचाचा डिस्प्ले असू शकतो, हा डिस्प्ले एक क्वाड HD+ 1440 पिक्सल रेजोल्यूशन सह येऊ शकतो. 
तसेच यात एक ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असू शकतो, सोबतच यात तुम्हाला 8GB च्या रॅम सह 128GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळू शकते. फोन मधील ड्यूल कॅमेरा पाहता 16+12 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा असू शकतो, तसेच सेल्फी साठी पण या स्मार्टफोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, जो 12+8-मेगापिक्सल चा कॅमेरा कॉम्बो आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :