भारतात २५ नोव्हेंबरला लाँच होणार HTC वन A9 स्मार्टफोन
HTC २५ नोव्हेंबरला एका कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, त्यासाठी कंपनीने मिडियाला निमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे.
मोबाईल निर्माता कंपनी HTC चा नवीन स्मार्टफोन वन A9 भारतात २५ नोव्हेंबरला लाँच होऊ शकतो. खरे पाहता HTC २५ नोव्हेंबरला एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, त्यासाठी कंपनीने मिडियाला निमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे. आशा आहे की ह्या कार्यक्रमात कंपनी आपला हा नवीन स्मार्टफोन सादर करेल. त्याचबरोबर कंपनी आपला डिझायर 828 स्मार्टफोनसुद्धा लाँच करेल.
HTC वन A9 मेटल यूनीबॉडीने सुसज्ज आहे. फोन दिसायला पातळ आहे. ह्या फोनची जाडी 7.26mm आहे. ह्या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास ४ कोटेट आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 617 चिपसेट, 64 बिट्सचे ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली आहे. त्याशिवाय ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा नवीन स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे.
त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर आणि ४ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा अल्ट्रापिक्सेल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हा नवीन स्मार्टफोन 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे, जो 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. ह्यात 2150mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
त्याचबरोबर ह्यात बूम साउंड इंटिग्रेशन आहे आणि ह्यात ग्राहकांना पहिले ६ महिने मोफत गुगल प्ले म्युजिक उपलब्ध होईल. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात USB, वायफाय, ब्लूटुथ, 3G आणि 4G सपोर्ट आहे.
तर HTC डिझायर 828 मध्ये ५.५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.5GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753 चिपसेट आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile