HTC 10 मध्ये असणार आकर्षक कॅमेरा, नवीन टीजरमध्ये कंपनीने केला दावा

Updated on 17-Mar-2016
HIGHLIGHTS

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर, एड्रेनो 530 GPU आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्या फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि USB टाइप-C पोर्टसारखे फीचरसुद्धा असू शकतात.

मोबाईल निर्माता कंपनी HTC लवकरच बाजारात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन HTC 10 सादर करु शकते. मागील काही दिवसांपासून ह्या फोनविषयी बरीच माहिती समोर येत आहे. कंपनीने ह्या फोनविषयी कोणतीही विशेष माहिती दिलेली नाही. तथापि, आतापर्यंत ह्याच्या लाँच तारखेविषयीही कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

आता कंपनीने HTC १० स्मार्टफोनचे एक नवीन टीजर जारी केले आहे. कंपनीने ह्या नवीन टीजरमध्ये आपल्या फोनच्या कॅमे-याविषयी बरेच कौतुक केले आहे. HTC ने ट्विट करुन अशी माहिती दिली आहे की, “तुम्ही पाहाल जगातील पहिली, वर्ल्डक्लास फ्रंट आणि रियर कॅमेरा”, त्याचबरोबर  कंपनीने पहिल्यासारखेच हॅशटॅग #powerof10 सुद्धा लिहिले आहे. ह्या ट्वीटमध्ये दाखवलेले फोटो नक्कीच HTC 10 च्या कॅमे-याचीच आहेत.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग Video

ह्याआधी ह्या फोनविषयी बरीच माहिती समोर आली होती. मात्र ह्या लीक्सनुसार, HTC 10 स्मार्टफोनमध्ये 5.15 इंचाची QHD डिस्प्ले असू शकते. त्याचबरोबर हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅहन 820 प्रोसेसर, एड्रेनो 530 GPU आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. त्याशिवा. ह्या फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचरसुद्धा असू शकतात.

अलीकडेच ह्या फोनचे काही फोटोज लीक झाले होते, ज्यानुसार, फोनमध्ये डिस्प्लेच्या खालच्या बाजूस एक फिजिकल होम बटन आणि दोन कॅपेसिटिव बटन व मल्टी विंडो एक्सेस असे पर्याय असतील.

हेदेखील वाचा – जिओनी W909 Clamshell स्मार्टफोन 29 मार्चला होऊ शकतो लाँच

हेदेखील वाचा – मायक्रोमॅक्स सरफेस प्रो 3 टॅबलेटच्या किंमतीतही झाली घसरण, ५८,९९० रुपयात उपलब्ध

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :