मोबाईल निर्माता कंपनी HTC ने आपला नवीन स्मार्टफोन वन X9 सादर केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनमध्ये केवळ चीनच्या बाजारात सादर केले आहे, मात्र लवकरच हा भारतात उपलब्ध केला जाईल. चीनमध्ये ह्या स्मार्टफोनची किंमत २,३९९ डॉलर (जवळपास २५,००० रुपये) मध्ये लाँच केला जाईल.
जर HTC वन X9 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 64 बिट्स ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात १३ मेगापिक्सेलाचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
HTC वन X9 हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन सेंसर युआय इंटरफेस वर चालतो. 4G LTE ला सपोर्ट करण्यासाठी HTC वन X9 मध्ये ब्लूटुथ V4.1, वायफाय 802.11 A/B/G/N/AC, मायक्रो-USB २.० आणि GPS/A-GPS कनेक्टिव्हिटी फीचर आहे. हा एबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, जी-मोशन सेंसर, कंपास, गायरोस्कोप आणि मॅग्नेटिक सेंसर आहे.
HTC वन X9 च्या ड्यूल फ्रंट स्पीकर डॉल्बी ऑडियो टेक्नॉलॉजीसह येतो. ह्याचे परिमाण 153.9×75.9×7.99mm आहे आणि ह्याचे वजन 170 ग्रॅम आहे.