HTC वन S9 स्मार्टफोन लाँच, 2GB रॅमने सुसज्ज
ह्यात 2GB चे रॅमसुद्धा दिले गेले आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ह्याच्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी HTC ने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन वन S9 लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन स्टाइलच्या बाबतीत काहीसा M9 सारखाच दिसतो. ह्या फोन्समध्ये जास्त अंतर नाहीय, तथापि, समोरुन बघताना ह्या स्मार्टफोन्समध्ये थोडा फरक नक्कीच दिसून येतो.
जर HTC वन S9 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकली तर, ह्यात 5 इंचाची पुर्ण HD सुपर LCD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या फोनमध्ये मिडियाटेक हेलिओ X10 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्यात 2GHz ऑक्टा-कोर कोर्टेक्स-A53 प्रोसेसर आहे. ह्यात 2GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ह्याच्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील पाहा – ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स
ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 2840mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये एक बूमसाउंड स्पीकरसुद्धा आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ, GPS सारखे फिचर्स देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – मोटो G टर्बो विराट फॅनबॉक्स सह भारतात झाला लाँच
हेदेखील वाचा- लेनोवो वाइब S1 स्मार्टफोनच्या किंमतीत झाली घट