मिडियाटेक हेलिओ X10 प्रोसेसर असणारा HTC वन M9e लाँच

Updated on 30-Oct-2015
HIGHLIGHTS

HTC ने आपला नवीन स्मार्टफोन चीनच्या बाजारात आणला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये २.२GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6795T हेलिओ X10 प्रोसेसर दिला गेला आहे.

HTC ने आपला २०१५च्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा नवीनतम आवृत्ती लाँच केली आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये HTC वन M9e नावाने लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत CNY 2,700(जवळपास २७,६५० रुपये) इतकी आहे. त्याचबरोबर हा चीनमध्ये ई-कॉमर्सच्या वेबसाइटवर मिळत आहे.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची FHD 1080×1920 पिक्सेल IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात आपल्याला एचटीसी वन M9+ सारखा 2.2Ghz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6795T हेलिओ X10 प्रोसेसर दिला गेला आहे. मात्र ह्या स्मार्टफोनमध्ये M9+मध्ये दिल्या गेलेल्या 3GB रॅमऐवजी 2GB  रॅम दिली आहे. स्मार्टफोनमध्ये १६जीबीची अंतर्गत स्टोरेज दिली गेली आहे,ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने २टीबीपर्यंत वाढवू शकतो.

ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अपर्चर, ऑटोफोकस,BSI सेंसर, OIS सह १०८० व्हिडियो रेकॉर्डिंगसोबत बाजारात आणले आहे. त्याचबरोबर ह्यात LED फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे. जर ह्याच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याबद्दल बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे, जो M9+9k सारखा आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपसह सेंसर UI वर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये सिंगल नॅनो-सिम सपोर्ट दिला गेला आहे.

त्याशिवाय ह्या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, तर ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्टसह, वाय-फाय, ब्लूटुथ ४.१, इन्फ्रारेड. DLNA, FM रेडियो आणि NFC दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये २८४०mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

 

ह्याआधी ह्या तायवानी कंपनीने शानदार कॅमेरा असलेला आपला वनप्लस M9+ लाँच केला होता. ह्या फोनमध्ये ५.२ इंच 1440×2560 पिक्सेल रिझोल्युशन सह क्वाड-एचडी डिस्प्ले दिला आहे. आपल्याला ह्यात ऑक्टा-कोर 2.2GHz मिडियाटेक प्रोसेसर आणि 3GB रॅम मिळत आहे. ह्या फोनचे अंतर्गत स्टोरेज ३२जीबी आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकतो.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :