मोबाईल निर्माता कंपनी HTC मार्च २०१६ मध्ये आपला नवीन स्मार्टफोन HTC वन M10 लाँच करु शकते. त्याचबरोबर आशा आहे की, HTC वन M10 स्मार्टफोन एप्रिलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
ही माहिती जीएसएमडोम द्वारा देण्यात आली आहे. जीएसएमडोमने दिलेल्या रिपोर्टमध्ये अशी माहिती दिली आहे की, HTC काही प्रोटोटाइममुळे नाखूष आहे आणि आपल्या डिझाइनवर चर्चा करत आहे. त्याशिवाय आशा आहे की, एप्रिलमध्ये कंपनीचा वाइव प्री हेडसेट निवडक बाजारात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हा डिवाइस अलीकडे CES 2016 मध्ये प्रदर्शित केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, HTC वन M10 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 चिपसेट दिला असेल. ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 23 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा मिळू शकतो. ह्यात 3000mAh ची बॅटरी असू शकते. फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. हा स्मार्टफोन IP68 सर्टिफाइड आहे, जो धूळीपासून आणि पाण्यापासून संरक्षित असेल.
मोबाईल निर्माता कंपनी HTC २०१६ मध्ये गुगल नेक्सस स्मार्टफोन बनवू शकते. समोर आलेल्या मिडिया रिपोर्टनुसार, गुगलने HTC सह दोन स्मार्टफोन्सच्या निर्मितीसाठी करार केला आहे.
गुगलने २०१६ मध्ये दोन नेक्सस स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन HTC द्वारा डेव्हलप केले जातील. मिळालेल्या माहितीनुसार, एचटीसीद्वारा बनवले जाणारे नेक्सस फोन 5 आणि 5.5 इंचाच्या डिस्प्लेचे असतील.
हेदेखील वाचा– मायक्रोसॉफ्ट 1 फेब्रुवारीला लाँच करणार आपला शेवटचा लुमिया फोन
हेदेखील वाचा- गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु