मोबाईल निर्माता कंपनी HTC २० ऑक्टोबरला एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे आणि असे सांगितले जातय की कंपनी ह्या कार्यक्रमात आपला नवीन स्मार्टफोन वन A9 लाँच करु शकते. ह्याचे कारण म्हणजे, अलीकडेच ह्या स्मार्टफोनची काही चित्रे लीक झाली आहेत, ह्या चित्रांना HTC वन A9 चा डमी युनिट असल्याचे सांगितले जातय.
कंपनीने आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रणे पाठविली आहेत. कार्यक्रमासाठी कंपनीने जी आमंत्रण पाठवली आहेत, त्यावर “मीटपर्यंत मार्शमॅलो फ्रॉम HTC” असे लिहिले आहे. म्हणजे हे स्पष्ट आहे की, HTC चा नंतरचा डिव्हाईस लेेटेस्ट अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
ह्याआधीही ह्या स्मार्टफोनची अनेक छायाचित्रे लीक झाली होती, मात्र ह्यावेळी लीक झालेल्या चित्रांना पाहून असे वाटते की, HTC च्या ह्या स्मार्टफोनचे डिझाईन अॅप्पल आयफोनसारखे असेल. चित्रात पाहू शकतो की, ह्या स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलला खालच्या भागात एक फिजिकल बटन दिले गेले आहे. त्याचबरोबर होम बटनसोबत फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे. वन A9 चा रियर कॅमेरा हँडसेटच्या वरच्या बाजूला मध्यभागी आहे. असे जास्तकरुन आपल्याला अॅनड्रॉईड स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळत नाही. चित्रांवरुन असेही समजते की, पॉवर आणि आवाजाचे बटन डाव्या बाजूला दिले गेले आहे आणि सिमकार्ड व मायक्रोएसडी कार्डची जागा उजव्या बाजूला आहे.
त्याचबरोबर अशाही बातम्या ऐकायला मिळतायत की, २० ऑक्टोबरला HTC आपल्या एरो स्मार्टफोनलासुद्धा लाँच करु शकतो. तसेच ह्या कार्यक्रमात कंपनी वन A9 आणि एरो हे दोन्ही स्मार्टफोन्ससुद्धा लाँच करु शकते.
जर HTC एरो च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, लीक्सनुसार ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असू शकते, ज्याचे रिझोल्युशन १०८०x१९२० पिक्सेल असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ह्यात २जीबी रॅम आणि १६ जीबीचे अंतर्गत स्टोरेज आहे. ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २१५०mAh बॅटरीसुद्धा असू शकते.