मोबाईल निर्माता कंपनी HTC ने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स HTC वन A9 आणि डिझायर828 ड्यूल सिम लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स डिसेंबर महिन्यापासून उपलब्ध होतील. सध्यातरी ह्या स्मार्टफोन्सची किंमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर आधारित HTC सेंस युआयवर चालणारा HTC वन A9 गुगलच्या लेटेस्ट मार्शमॅलो ओएसवर चालणारा कंपनीचा पहिला हँडसेट आहे. HTC वन A9 मेटल यूनीबॉडीने सुसज्ज आहे. फोन दिसायला एकदम पातळ आहे आणि ह्याची जाडी ७.२६mm आहे. जर ह्या स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे, त्याचबरोबर हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 कोटेड आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 617 चिपसेट, 64 बिट्सचे ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ३जीबीच्या रॅमने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर आणि 4 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा अल्ट्रापिक्सेल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हा नवीन स्मार्टफोन 6.0 मार्शमॅलोल ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे, ज्यात ६.० मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टम दिले गेले आहे. ह्यात 2150mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर ग्राहकांना पहिल्या ६ महिन्यासाठी गुगल प्ल म्यूझिक मोफत उपलब्ध होईल. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात USB, वायफाय, ब्लूटुथ, 3G आणि 4G सपोर्ट बॅटरी दिली गेली आह.
त्याचबरोबर HTC डिझायर 828 ड्यूल सिम स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे., ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.5GHz ऑक्टा-कोर,मि़डियाटेक MT6753 चिपसेट आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.