मोबाईल निर्माता कंपनी HTC मागील अनेक महिन्यापासून आपला नवीन फोन HTC वन M10 वर काम करत आहे. अलीकडेच अशी माहिती मिळाली होती, कंपनी आपल्या ह्या फोनला १९ एप्रिलला सादर करु शकते. आणि आता ह्या फोनविषयी एक नवीन बातमी समोर येत आहे ती म्हणजे हा अनेक रंगात उपलब्ध होणार आहे.
ह्या नवीन माहितीनुसार HTC वन M10 ची इमेज दिली आहे. लीक केलेल्या माहितीनुसार, HTC चा हा नवीन फोन चार वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होईल. ही माहिती अपलिक्सने दिली आहे.
अपलिक्सद्वारा शेअर केलेली ही माहिती बुल्गारियन साइट नेक्साबलवर दिली गेली आहे. ज्यात HTC वन M10 ला काळ्या व पांढ-या फ्रंट पॅनल पर्यायाच्या रुपात दाखवला आहे. इमेजमध्ये पांढ-या रंगात पांढरा आणि सोनेरी असे दोन बॅक पॅनल पर्याय दिले गेले आहेत. तर काळ्या फ्रंट पॅनल प्रकारात पांढरा आणि काळा बॅक पॅनलचा पर्याय उपलब्ध होईल.
हयात आलेल्या लीक्सनुसार, HTC वन M10 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० चिपसेटसह असेल. ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी २३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा मिळू शकते. ह्यात 3000mAh ची बॅटरी असू शकते. फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. हा स्मार्टफोन IP68 सर्टिफाइड आहे, जो धूळीपासून आणि पाण्यापासून रक्षण करेल.
हेदेखील वाचा – इंटेक्स LED मॉनिटर 1901 लाँच: किंमत केवळ ६,००० रुपये
हेदेखील वाचा – तुमचे फेसबुक अकाउंट हॅक होण्यापासून कसे रोखाल?