HTC डिझायर 828 ड्यूल सिम स्मार्टफोन लाँच
ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD IPS दिली गेली आहे, ज्याचे रिझाल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन १.५GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753 चिपसेट आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे.
मोबाईल निर्माता कंपनी HTC ने आपला नवीन स्मार्टफोन डिझायर 828 ड्यूल सिम लाँच केला आहे. कंपनीने ह्याला आपल्या चीनच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केले आहे.
ह्या स्मार्टफोनची किंमत 1,599 चीनी युआन(जवळपास १६,५०० रुपये) ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर ह्याची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, HTC डिझायर 828 ड्यूल सिम स्मार्टफोन डिझायर सीरिजचा पहिला हँडसेट आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन वैशिष्ट्याने सुसज्ज आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.5GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक MT6753 चिपसेट आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे.
त्याशिवाय ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि BSI सेंसरने सुसज्ज असा अल्ट्रापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. HTC डिझायर 828 ड्यूल सिम अॅनड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉपसह येईल आणि त्यावर HTC सेंस स्किन समाविष्ट असेल. ह्यात २८००mAh ची बॅटरी असू शकते.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, FM रेडियो, ब्लूटूथ, GPRS/एज, GPS/ए-GPS, 3G, मायक्रो-USB आणि 4G LTE समाविष्ट आहे. ह्याचे परिमाण १५७.७x७८.८x७.९mm आहे.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile