मोबाईल निर्माता कंपनी HTC ने आपला नवीन स्मार्टफोन डिझायर 728G ड्यूल सिम भारतीय बाजारात सादर केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत 17,990 रुपये ठेवली आहे. ह्याआधी ह्या स्मार्टफोनला चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1080 पिक्सेल आहे. ह्यात 1.3GHz 64-बिट्स ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
त्याचबरोबर ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 5.0 लॉलीपॉप अनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. त्याचबरोबर ह्यात HTC सेंस UI पाहायला मिळेल, जो ह्याला साधारण अॅनड्रॉईड स्मार्टफोनपेक्षा वेगळा बनवतो.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला उत्कृष्ट म्यूजिक इंटीग्रेशनसह सादर केले आहे. ज्यात ऑडियोसह फ्रंट ड्युल स्पीकरसुद्धा उपलब्ध आहे, जो उत्कृष्ट म्युजिकसाठी ओळखला जातो.