मोबाईल निर्माता कंपनी HTC ने आपला नवीन स्मार्टफोन डिझायर 728 भारतात लाँच केला आहे. भारतीय बाजारात HTC डिजायर 728 स्मार्टफोनची किंमत 17,990 रुपये असेल. सध्यातरी ह्या स्मार्टफोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही सविस्तर माहिती मिळाली नाही. ह्याआधी कंपनीने सप्टेंबरमध्ये हा स्मार्टफोन चायनामध्ये सादर केला होता.
HTC डिझायर 728 स्मार्टफोनची माहिती मुंबईतील महेश टेलिकॉमने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ह्यात HTC डिझायर 728 च्या इमेजसह त्याची वैशिष्ट्ये आणि किंमतीबाबतसुद्धा सांगितले गेले आहे. तसेच ह्या फोनला कमिंग सूनसह वर्ल्ड फोन असेही नाव देण्यात आले आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा स्मार्टफोन १.३GHz चे ६४ बिट्स ऑक्टा-कोर प्रोसेसर (मीडियाटेक चिपसेट) आणि २जीबी रॅमने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता.
त्याशिवाय HTC डिझायर 728 स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.0.2 लॉलीपॉपवर चालतो.