HTC डिझायर 630 स्मार्टफोन भारतात झाला विक्रीसाठी उपलब्ध
अजून तरी हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइट वर “Coming Soon” सह लिस्ट केला आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता HTC ने मे महिन्यात HTC 10 आणि वन X9 स्मार्टफोनसह HTC डिझायर 630 स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची घोषणा केली होती. तथापि, कंपनीने ह्याच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नव्हती. आता मुंबईतील एक रिटेलर कंपनी महेश टेलिकॉमने असा दावा केला आहे की, HTC डिझायर 630 स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ह्या स्मार्टफोनची भारतीय बाजारात किंमत १४,९९० रुपये आहे.
HTC डिझायर 630 स्मार्टफोन अॅनड्रॉईड मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. ह्यात 1.6GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 400 क्वाड-कोर प्रोसेसरसुद्धा आहे. ह्या फोनमध्ये 2GB ची रॅम दिली आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा 4G सपोर्टसह येतो.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात 2200mAh ची बॅटरीसुद्धा आहे. फोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ, वायफाय, 3.5mm जॅक, मायक्रो-USB 2.0 पोर्टसारखे फीचर्स आहेत.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
हेदेखील वाचा – वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध