HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी

HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी
HIGHLIGHTS

HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोन ला ११,९९० रुपयात खरेदी केले जाऊ शकते.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी HTC ने फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचच्या काही वेळानंतरच कंपनीने डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनच्या किंमतीत १००० रुपयांची घट केली. आणि आता पुन्हा एकदा कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत २,००० रुपयांची घट केली आहे. आता HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनला आपण ११,९९० रुपयात खरेदी करु शकता. |
 

ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 4.4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. त्याचबरोबर HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनमध्ये 1.7GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6752 प्रोसेसर आहे. हा 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील पाहा – फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी

तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, जो 4G LTE ने सुसज्ज आहे. ह्यात 3G, ब्लूटुथ, वायफाय, मायक्रो-USB, A-GPS, 3.5mm ऑडियो जॅकसारखे फीचर्ससुद्धा दिले आहेत. ह्यात 2000mAh ची बॅटरी दिली आहे. ह्याचे वजन 146.9×70.9×8.19mm आणि वजन १३५ ग्रॅम आहे.

 

हेदेखील वाचा – शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेले हे स्मार्टफोन्स एकमेकांना देतात कडक टक्कर

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo