एचटीसी ने आपल्या HTC 10 स्मार्टफोन साठी एंड्रॉयड 8.0 ओरियो अपडेट जारी केला आहे. ओटीए अपडेट टप्प्या टप्प्याने दिला जात आहे. हा अपडेट कोर एंड्रॉयड ओरिओ सुविधांसह डिवाइस वर जियो VoLTE साठी सपोर्ट पण देतो.
HTC 10 स्मार्टफोन साल 2016 मध्ये एंड्रॉयड 6.0 मार्शमेलो सह लॉन्च केला गेला होता आणि मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये याला एंड्रॉयड 7.0 नूगा अपडेट मिळालेला. कंपनी ने ट्वीट करून यूजर्सना अपडेट चेक करण्यास सांगितले आहे, अपडेट ची साइज 1.43 GB आहे.
तुम्ही मॅन्युअली अपडेट बघू शकता, यासाठी सेटिंग्स मध्ये जा मग अबाउट टॅब मध्ये जाऊन सॉफ्टवेयर अपडेट वर क्लिक करून बघू शकता की तुमचा डिवाइस अपडेटेड आहे की नाही ते. हा फक्त वाय-फाय वर अपडेट केला जाऊ शकतो.
अपडेट मुळे स्मार्टफोन मध्ये पिक्चर-इन-पिक्चर (पीआईपी) मोड, नवीन नोटिफिकेशन डॉट्स, न्यू क्विक सेटिंग्स मेन्यू, ऑटोफिल आणि दूसरे नवीन फीचर्स येतील. HTC ने HTC 10 व्यतिरिक्त आपल्या दुसर्या स्मार्टफोंस HTC U11 आणि HTC U Ultra साठी पण ओरियो अपडेट आणणार असल्याचे सांगितले होते. आशा आहे की या फोन्स साठी पण लवकरच ओरियो अपडेट येईल.