स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने सुसज्ज असलेला HTC 10 स्मार्टफोन भारतात लाँच

स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने सुसज्ज असलेला HTC 10 स्मार्टफोन भारतात लाँच
HIGHLIGHTS

HTC 10 शिवाय कंपनीने ह्या कार्यक्रमादरम्यान पाच अन्य स्मार्टफोन्स सुद्धा लाँच केले. वन X9, डिझायर 830, डिझायर 825, डिझायर 630 आणि डिझायर 628 अशी त्यांची नावे आहेत.

HTC ने भारतात आपला 2016 चा फ्लॅगशिप स्मार्टफोन HTC 10 लाँच केला. ह्या स्मार्टफोनला मागील महिन्यात ग्लोबली लाँच केले गेले होते. ह्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आले आहे. ह्या डिवाइसमध्ये 5.2 इंचाची क्वाड HD सुपर LCD 5 डिस्प्ले दिली आहे. ह्या फोनमध्ये 4GB ची रॅमसुद्धा देण्यात आली आहे. ह्या फोनची किंमत ५२,९९९ रुपये आहे.
 

ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या कॅमे-यामध्ये सोनी Exmor R IMX377 इमेज सेंसर आहे. हा कॅमेरा OIS आणि लेजर असिस्टेड ऑटोफोकस आणि f/1.8 लेन्सने सुसज्ज आहे. ह्याचा रियर कॅमेरा 4K व्हिडियोसुद्धा रेकॉर्ड करतो. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे.

HTC 10 स्मार्टफोनमध्ये आपल्याला 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आली आहे. ह्या स्टोरेजला आपण 2TB पर्यंत वाढवू शकतो. ह्या फोनमध्ये होम बटन फिंगरप्रिंट स्कॅनरसारखे वापरू शकतो. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा क्विक चार्ज 3.0 सपोर्टसह येतो. हा फोन अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर काम करतो. ह्या फोनला 5 जूनला शिप केले जाईल आणि पहिल्या 500 ग्राहकांना HTC चे डॉट व्यू केज मोफत दिली जाईल.

ह्या कार्यक्रमात कंपनीने इतर ५ फोन्स लाँच केले. HTC वन X9 स्मार्टफोन मिडियाटेक हेलिओ X10 प्रोसेसर, 3GB रॅम, 32GB चे वाढवता येणारे स्टोरेज, 4G LTE कनेक्टिव्हिटी, बूमसाउंड डॉल्बी ऑडियो, 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 5.5 इंचाची पुर्ण HD सुपर LCE डिस्प्लेने सुसज्ज आहे. वन X9 ची किंमत २५,९९० रुपये आहे.

तर डिझायर 630 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 400, 2GB ची रॅम, 16GB चे स्टोरेज दिले गेले आहे. डिझायर 630 आणि 628 दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले आहे. डिझायर 830 मध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले आहे. तर डिझायर 825 मध्ये ५.५ इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. डिझायर 630 ची किंमत १८,९९० रुपये, डिझायर 625 ची किंमत १३,९९० रुपये आहे. आतापर्यंत डिझायर 830 आणि डिझायर 825 च्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेदेखील वाचा – नोकिया नेटवर्क्स 5G नेटवर्कच्या ट्रायलसाठी टेलकोसशी करतायत बातचीत
हेदेखील वाचा – 
आसूस झेनपॅड 8, झेनपॅड 10 टॅबलेट लाँच, अॅनड्रॉईड मार्शमॅलोने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo