बहुप्रतिक्षित असा HTC 10 स्मार्टफोन झाला अखेर लाँच

Updated on 13-Apr-2016
HIGHLIGHTS

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला HTC चा नवीन स्मार्टफोन HTC 10 अखेर लाँच झाला. कंपनीने ह्या स्मार्टफोनला 12MP च्या अल्ट्रापिक्सेल कॅमेरा आणि बूमसाउंड स्पीकरसह लाँच केले आहे.

HTC ने आपला नवीन स्मार्टफोन ज्याची सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात होते, तो HTC 10 स्मार्टफोन अखेर लाँच झाला. ह्या स्मार्टफोनला 12MP च्या अल्ट्रापिक्सेल कॅमेरा आणि बूमसाउंड स्पीकरसह लाँच केले आहे.
 

ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 12MP चा अल्ट्रापिक्सेल कॅमेरा दिला गेला आहे, जो f/1.8 अॅपर्चर आणि OIS सह लेजर ऑटोफोकससह लाँच झाला आहे. ह्या कॅमे-याने आपण 12 बिट ची रॉ, 4K 2160 व्हिडियो आणि Hi-res ऑडियो रेकॉर्डिंग करु शकता.

असे पहिल्यांदाच होत आहे की, कोणत्या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमे-यामध्ये OIS दिला गेला आहे. हा कॅमेरा 5MP आहे, जो 1.34µm पिक्सेल आणि f/1.8 अॅपर्चरसह दिला गेला आहे.

ह्यात बूमसाउंडसुद्धा दिला गेला आहे. ह्यात आपल्याला स्पीकरसुद्धा मिळत आहे. ह्यात आपल्याला वूफरसुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर प्रत्येक स्पीकरचा वेगळा असा amp. आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची QHD 1440×2560 पिक्सेल रिझोल्युशनची डिस्प्ले दिली गेली आहे. ही एक सुपर LCD 5 डिस्प्ले आहे, जी कर्व्ह्ड गोरिला ग्लाससह येते. त्याशिवाय हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो आणि ह्यात आपल्याला स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर सह 4GB रॅमसुद्धा दिली गेली आहे त्याचबरोबर ह्याच्या 32GB व्हर्जनची किंमत ७०० डॉलर आहे, पण 64GB व्हर्जनच्या किंमतीविषयी अजूनपर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. दोन्ही व्हर्जनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळत आहे. ज्याच्या माध्यमातून आपण ह्याची स्टोरेज वाढवू शकतो. ह्यात आपल्याला 3000mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे, जो क्विक चार्ज 3.0 द्वारा केवळ ३० मिनिटांत ५० टक्के बॅटरी चार्ज करतो.

हेदेखील वाचा – लेनोवो फॅब फॅबलेट: १३ मेगापिक्सेलच्या रियर कॅमे-याने सुसज्ज

हेदेखील वाचा – सोनी एक्सपिरिया Z2, Z3, Z3 कॉम्पॅक्टला अॅनड्रॉईड मार्शमॅलोचे अपडेट मिळणे सुरु

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :