मोबाईल निर्माता कंपनी HP लवकरच बाजारात आपला पहिला विंडोज 10 स्मार्टफोन सादर करेल. मिळालेल्या माहितीनुसार HP च्या ह्या स्मार्टफोनचे नाव फाल्कन असल्याचे बोलले जातय. तसेच अशीही माहिती मिळाली आहे की, हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल.
प्राप्त केलेल्या माहितीनुसार, HP च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन फाल्कनविषयी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१६ मध्ये घोषणा केली जाऊ शकते. २०१६ मध्ये २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान बार्सिलोनामध्ये MWC चे आयोजन केले जाईल.
त्याचबरोबर HP फाल्कन नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 चिपसेट, एड्रेनो 530 GPU, कमीत कमी 2GB रॅम आणि 5.8 इंचाच्या क्वाड-HD डिस्प्लेने सुसज्ज असेल. त्याचबरोबर ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेज असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेराही असू शकतो.
ह्या रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे की. HP फाल्कनच्या रिलीजमुळे शक्यता आहे की, ग्राहकांना विंडोज मोबाईल सेगमेंट आणि विकल्प मिळतील. किंवा असेही होऊ शकते की, मायक्रोसॉफ्ट लवकरच बाजारात आपला सर्फेस स्मार्टफोनसुद्धा बाजारात आणेल.