एकदा का आपण नवीन गॅजेट्स खरेदी केले, तर क्वचितच लोक असे आहेत, ज्यांचे जुने गॅजेट्स वापरता येतात. त्यामुळे बरेच गॅजेट्स असे असतात, जे फक्त घरात धूळ खात असतात आणि त्यांचा काही उपयोग होत नाही. तर अशा परिस्थितीत, आता बर्याच ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोबाईल सारख्या गॅजेटची एक्सचेंज करण्याची सुविधा आहे. मात्र, इतर गॅजेट्स घरी धुळीत ठेवण्याऐवजी त्यांची विक्री करणे कधीही उत्तम ठरेल.
होय, जर तुम्हालाही घरात पडलेले जुने गॅजेट्स विकून मोठी कमाई करायची असेल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला काही ऑनलाइन वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या स्मार्टफोन ते टॅबलेट, टीव्ही ते एसीपर्यंत सर्व गॅजेट्स विकून चांगले पैसे कमवू शकता.
हे सुद्धा वाचा : WhatsApp वर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करणे झाले सोपे, जाणून घ्या कसे कराल कॉल रेकॉर्ड…
कॅशिफाय वर स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही, कॅमेरा, iMacs, गेमिंग कन्सोल आणि AC सारख्या गॅजेट्सची विस्तृत कॅटेगरी विकली जाऊ शकते. या वेबसाईटवर तुम्हाला गॅजेट्सची चांगली किंमतही मिळेल. स्मार्टफोनच्या बाबतीत, ही साइट इतर साइटच्या तुलनेत चांगली किंमत देते, अशी माहिती मिळाली आहे. या ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे प्रोडक्ट कमी वेळात सहज विकता येईल.
Cashify प्रमाणेच, 2gud स्मार्टफोन, टॅबलेट, गेमिंग कन्सोल आणि टीव्ही यांसारख्या गॅजेट्सची विक्री करतो. फ्लिपकार्टच्या मालकीच्या या साइटवर गॅजेट खरेदी आणि विक्री करता येते. महत्त्वाचे म्हणजे या साइटवर रिटर्नचा पर्यायही उपलब्ध आहे.
येथे ग्राहक त्यांचे जुने आणि चांगल्या स्थितीत असलेले गॅजेट्स विकू शकतात. ही कंपनी 2013 पासून कार्यरत आहे आणि आता भारतातील लोकप्रिय पुनर्वापर केंद्रांपैकी एक आहे. www.karmarecycling.in ने आत्तापर्यंत 4 लाखांहून अधिक गॅजेट्स खरेदी केले आहेत.
Getinstacash वर, तुम्हाला तुमचे कोणतेही जुने स्मार्टफोन सहज विकता येतील आणि चांगली किंमत मिळेल. तुमच्या बुकिंगनंतर कंपनीचे कर्मचारी तुमच्या घरी येतील आणि फोन घेऊन किंमत देतील. मात्र, Instacash वर फक्त स्मार्टफोन विकले जाऊ शकतात.