स्मार्टफोन वापरण्यासाठी थंडीत हॅन्ड ग्लोव्हज सारखे काढावे लागतात.
गारठ्यात स्मार्टफोन वापरण्यासाठी आता फोनमध्ये 'Gloves Mode' फिचर सुद्धा दिले जाते.
तुमचा स्मार्टफोन ग्लोव्हजसह वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 'ग्लोव्हज मोड' ऑन करावे लागेल, पहा प्रक्रिया
Smartphones Tips For Winters: हिवाळ्यात सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी सुरु आहे. तर, डिसेंबर आणि जानेवारीदरम्यान मोठ्या प्रमाणात गारठा पडतो. गारठ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण गरम कपडे, मोजे तसेच हातमोजे म्हणजेच ग्लव्सचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. थंडीमध्ये बाहेर पडताना हे स्वेटर, मफलर, हॅन्ड ग्लव्स घालूनच बाहेर पडावे लागते. मात्र, स्मार्टफोन वापरण्यासाठी ग्लव्स सारखे काढावे लागतात, थंडीमध्ये ही देखील एक समस्याच असते. पण, यासाठी देखील तुमच्या फोनमध्ये एक महत्त्वाचे फिचर देण्यात आले आहे, ज्याबद्दल क्वचित लोकांनाच माहिती असेल.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की, आता निवडक स्मार्टफोनमध्ये ‘Gloves Mode’ देण्यात आला आहे. हा मोड ऑन केल्यानंतर, तुम्हाला ग्लोव्हज घालून सुद्धा तुमचा स्मार्टफोन आरामात वापरता येईल. स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले ‘ग्लोव्हज मोड’ हे फिचर हिवाळ्यात अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हा मोड ऑन केल्यानंतर तुम्हाला स्मार्टफोन वापरण्यासाठी सतत ग्लोव्हज काढण्यापासून मुक्ती मिळेल. चला तर मग जाणून घेउयात हे फिचर ऑन कसे करावे?
‘अशा’प्रकारे ऑन करा ग्लोव्हज मोड
तुमचा स्मार्टफोन ग्लोव्हजसह वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ‘ग्लोव्हज मोड’ ऑन करावे लागेल. यासाठी स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
यानंतर खाली स्क्रोल करा, येथे तुम्हाला Accessibility and Convenience चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
Accessibility and Convenience पर्यायावर जाऊन, तुम्हाला Gloves Mode दिसेल.
ग्लोव्हज मोडच्या पुढील टॉगल ऑन करा. यानंतर तुम्ही ग्लोव्हज घालून सुद्धा तुमचे स्मार्टफोन स्क्रीन वापरू शकता.
अशाप्रकारे ही सेटिंग चालू केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये ग्लोव्हज मोड ऑन होईल. आता तुम्ही थंडीत बाहेर गेल्यावर ग्लोव्हज घालून तुमचा स्मार्टफोन वापरण्यास सहज सक्षम असाल. यानंतर तुम्हाला फोन वापरण्यासाठी सतत ग्लोव्हज काढावे लागणार नाहीत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.