How to: इंटरनेटशिवाय Google Maps वर ऑफलाइन मार्ग पहा, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Updated on 28-Jun-2024
HIGHLIGHTS

Google मॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला अज्ञात आणि नवीन ठिकाणांचे मार्गदर्शन सहज केले जाते.

Google Map वापरण्यासाठी सहसा तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता असते.

आता Google Map वर ऑफलाइन मॅप्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Offline Google Maps: आजकाल प्रत्येक स्मार्टफोन युजर Google मॅप्सचा वापर करतो. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला अज्ञात आणि नवीन ठिकाणांचे मार्गदर्शन सहज केले जाते. जेव्हा आपण नवीन ठिकाणी फिरायला जातो किंवा नवीन शहरात स्थायिक होणार असतो, त्यावेळी रस्ते शोधण्यासाठी गुगल मॅप हाच आपला एकमेव आधार आहे. पण, Google Map वापरण्यासाठी सहसा तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता असते.

जर तुम्ही Google Map वर अवलंबून राहून कुठेतरी जात असाल आणि वाटेत फोनमध्ये नेटवर्क येणे बंद झाले तर तुम्ही काय कराल? ही परिस्थिती टाळण्यासाठी Google Map चे ऑफलाइन फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या फीचरद्वारे तुम्ही इंटरनेटशिवायही Google Map वर मार्ग शोधण्यास सक्षम असाल.

Also Read: Price Cut! लेटेस्ट Samsung 5G फोनवर तब्बल 6000 रुपयांची कपात, पॉवरफुल फीचर्स उपलब्ध

Offline Google Maps

आता गुगल मॅप्सवर ऑफलाइन मॅप्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ऑप्शनद्वारे तुम्ही Google Map ऑफलाइन वापरून मार्ग पाहू शकता. हे फीचर Android आणि iPhone दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

#इंटरनेटशिवाय Google Maps वर ऑफलाइन मार्ग पहा

Offline Google Maps चा वापर कसा करावा?

  • सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Maps उघडा.
  • वरच्या डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
  • येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्हाला येथे Offline Maps शे पर्यायावर टॅप करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या समोर एक मॅप ओपन होईल. तुम्हाला तो नकाशा डाउनलोड करावा लागेल.
  • आता डाउनलोड केलेला नकाशा तुमच्या समोर येईल.
  • यानंतर डाउनलोड केलेल्या नकाशावर टॅप करा.
  • आता तुम्ही इंटरनेटशिवाय Google Map वर मार्ग पाहू शकता.
  • यानंतर तुम्हाला फक्त Google Map वर जावे लागेल आणि सर्च बारमध्ये तुम्हाला जिथे शोधायचा आहे तो मार्ग टाकावा लागेल.

वरील सेटिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही नेटवर्क आणि इंटरनेट नसलेल्या भागात जाल तेव्हा तुम्ही Google Maps उघडून कोणत्याही ठिकाणचा मार्ग शोधू शकता. यासाठी सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचे नाव टाकावे लागेल. यासह, तुम्ही ठिकाणाचे नाव टाकताच तुमच्यासमोर ऑफलाइन नकाशा उघडेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :