आता सर्वत्र मोबाईल डेटाचा वापर झपाट्याने वाढला आहे. कुणी कामांसाठी तर कुणी आपल्या मनोरंजनासाठी इंटरनेट डेटा वापरत असतात. आता घरात आणि कार्यालयात Wi-Fi चा वापर होत असल्यामुळे युजर्स बेहिशोबीपणे डेटाचा वापर करतात. पण घराबाहेर असताना तुमच्या Smartphone मध्ये मर्यादित डेटा असतो. अनेक युजर्स फोनमधील दैनंदिन डेटा अवघ्या काही तासात संपतो, अशी तक्रार करतात. तुम्हाला देखील ही अडचण असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. तुमचा डेटा लवकरात लवकर संपू नये, म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स आणल्या आहेत.
Also Read: Redmi 13 5G ची आज पहिली Sale आजपासून होणार सुरु, अप्रतिम सवलतीसह खरेदी करण्याची संधी
मोबाईल डेटा सेव्ह करण्यासाठी फोनवरील कोणते Apps जास्त डेटा वापरत आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डेटा ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला कळेल की, कोणते ॲप जास्त डेटा वापरत आहे. या ऍप्सचा वापर कमी करून डेटा वाचवता येतो.
फोनमध्ये असे अनेक ॲप्स आहेत, जे फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरु नसतानाही डेटा वापरत राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही डेटा सेव्हर मोड वापरून बॅकग्राउंड डेटा वापर थांबवू शकता. असे केल्याने, डेटाचा वापर कमी होईल आणि डेटा जास्त काळ वापरता येईल.
बरेच लोक स्मार्टफोनवर ऑनलाइन स्ट्रीमिंग करतात, जसे की Youtube, Instagram आणि WhatsApp वर जेव्हा तुम्हाला एखादा व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल. तेव्हा तो व्हीडिओ HD किंवा हाय कॉलिटीमध्ये डाउनलोड करणे टाळा. असे केल्याने, डेटाचा वापर वाढेल आणि परिणामी मोबाइल डेटा लवकर संपतो. जर कोणताही व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर लो कॉलिटीमध्ये डाउनलोड करा.
साधरणतः लोक गरज नसतानाही मोबाईल डेटा ऑन ठेवतात. जर तुम्हीही अशी चूक करत असाल तर, असे करणे टाळावे. बरेच ॲप्स किंवा काही कामे ऑफलाइन मोडमध्ये देखील केली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत डेटाचा अनावश्यक वापर रोखता येईल.