वाढदिवसाला जवळच्या व्यक्तीला शुभेच्छा दिली नाही तर त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागते.
मात्र, आता तुम्हाला याबाबत नाराजीची चिंता करण्याची गरज नाही.
सध्या अनेक Android स्मार्टफोन 'Add Birthday' नावाच्या फिचरसह येतात.
Smartphone Tips: तुमचा जन्मदिवस हा तुमच्यासोबत तुमच्या प्रियजनांसाठीही महत्त्वाचा असतो. आपणा सर्वांना माहीतीच आहे की, वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. या दिवशी प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्तींकडून शुभेच्छा मिळतात. मात्र, तुमच्या जवळच्या प्रेत्यक व्यक्तीचा वाढदिवस लक्षात ठेवणे, जरा कठीणच आहे. जर तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस विसरलात तर, तुम्हाला त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागते.
मात्र, आता तुम्हाला या नाराजीची चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला माहितीच आहे की, डिजिटल युगात तुमच्या सर्व समस्यांचे समाधान तुमच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. जर तुम्ही अनेकदा तुमच्या मित्रपरिवाराचे वाढदिवस विसरत असाल तर Android स्मार्टफोनचे एक सिक्रेट फिचर आहे, जे तुमच्या या समस्येवरचे समाधान आहे.
Add Birthday
सध्या अनेक Android स्मार्टफोन ‘Add Birthday’ नावाच्या फिचरसह येतात. या फीचरद्वारे तुम्ही तुमच्या फोनमध्ये सर्व खास लोकांचे वाढदिवस ऍड करून ठेऊ शकतात. जे तुमच्या विशेष जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांच्या वाढदिवसाची तारीख ऍड करून ठेवतो. हे फिचर त्यांचा वाढदिवस येण्यापूर्वी हे फिचर तुम्हाला स्मरणपत्रे देणे सुरू करेल. यासह तुम्ही त्या खास व्यक्तीचा वाढदिवस विसरू शकणार नाही.
स्मार्टफोनमध्ये Add Birthday फिचर कसे वापरावे?
Add Birthday फिचर वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Android स्मार्टफोनमधील डायलर ओपन करावा लागेल.
यानंतर डायलरमध्ये त्या मित्राचा संपर्क शोधा, ज्याचा वाढदिवस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर, त्या संपर्काच्या शीर्षस्थानी दिसणाऱ्या पेन्सिल आयकॉनवर टॅप करा.
आता पुढील विंडोमध्ये तुम्हाला अनेक नवीन पर्याय दिसतील. थोडे खाली स्क्रोल केल्यास, येथे तुम्हाला Add email सोबत Add Birthday चा पर्याय दिसेल.
यानंतर तुम्ही त्या संपर्काचा म्हणजेच तुमच्या मित्राचा वाढदिवस ऍड करण्यास सक्षम असाल. यामध्ये तुम्हाला तारीख आणि महिना टाकावा लागेल.
अशाप्रकारे तुमच्या खास मित्र-मैत्रिणी आणि इतरांचे बर्थडे ऍड केले जाईल. जेव्हा कधी तुमच्या मित्राचा वाढदिवस येणार आहे, तेव्हा तुमचा फोन तुम्हाला मित्र-मैत्रिणीच्या वाढदिवसाची आठवण करून देईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.