Tips: पावसाळ्यात पाण्यापासून आपल्या महागड्या गॅजेट्सचे संरक्षण करा, जाणून घ्या अगदी सोप्या टिप्स 

Tips: पावसाळ्यात पाण्यापासून आपल्या महागड्या गॅजेट्सचे संरक्षण करा, जाणून घ्या अगदी सोप्या टिप्स 
HIGHLIGHTS

पावसाळ्यात आपल्याला घराबाहेर जाताना उपकरणांची विशेष काळजी घ्यावी लागते.

बहुतेक लोक फोन खिशात किंवा पिशवीत ठेवतात, परंतु ही युक्ती नेहमीच उपयोगी ठरेल असे नाही.

जाणून घेऊयात पावसाच्या पाण्यापासून महागड्या गॅजेट्सचे बचाव कसे कराल?

भारतात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, पावसाळ्यात आपल्याला घराबाहेर जाताना प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. तुमच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या वस्तू उदा. कागदपत्रे, स्मार्टफोन आणि इतर उपकरणे यांची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाच्या पाण्यात तुमच्या महत्त्वाच्या वस्तू खराब होऊ शकतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला पावसाच्या पाण्यापासून तुमचे महागडे गॅजेट्स कसे संरक्षित करावे, याबद्दल Tips देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात पावसाच्या पाण्यापासून तुमच्याजवळ असलेल्या महागड्या गॅजेट्सचे बचाव कसे कराल?

Also Read: दरवाढीनंतर Jio, Airtel आणि Vodafone Idea चा सर्वात Affordable मासिक प्लॅन्स, जाणून घ्या बेनिफिट्स

सविस्तरपणे सांगायचे झाल्यास, पावसाळ्यात लोक ऑफिसला किंवा काही कामानिमित्त बाहेर पडतात. अशा परिस्थितीत लोक आपला लॅपटॉप किंवा फोन इत्यादी पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय वापरतात. बहुतेक लोक फोन खिशात किंवा पिशवीत ठेवतात. परंतु ही युक्ती नेहमीच उपयोगी ठरेल असे नाही. काहीवेळा पावसाचे पाणी पिशवीत जाऊन गॅझेट खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचे पाण्यापासून संरक्षण करणे हे मोठे आव्हान बनले आहे.

tips: जाणून घेऊयात पावसाच्या पाण्यापासून महागड्या गॅजेट्सचे बचाव कसे कराल?

वॉटरप्रूफ बॅग्स

पावसात अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेऊन ऑफिसला जावे लागत असेल, तर गॅजेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ बॅगचा वापर करणे आवश्यक आहे. हजारो रुपये किमतीचे गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उत्तम कॉलिटीचे वॉटरप्रूफ बॅग बाजारात उपलब्ध आहेत. अशा वेळी पावसात सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवा आणि त्यानंतरच घराबाहेर पडा.

‘ही’ चूक अजिबात करू नका.

पावसाळ्यात अनेकदा लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून निष्काळजीपणा करतात. हे अनेक वेळा पाहिले गेले आहे की, लोक त्यांचे मौल्यवान गॅजेट्स ओल्या पृष्ठभागावर ठेवतात. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा गॅजेटमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

गॅजेट्समध्ये पाणी गेल्यास काय कराल?

इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये चुकून पाणी शिरल्यास, घाबरू नका. इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये पाणी गेल्यास लगेच ते सिलिकॉन कव्हर्सने कोरडे करण्याचा प्रयत्न करा. त्याबरोबरच, इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये पाणी गेल्यानंतर ते त्वरित उपकरण चार्ज करण्याची चूक करू नका. अशा स्थितीत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स उघडून सुकविण्यासाठी एखाद्या कोरड्या जागी ठेवा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo