स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. प्रत्येक व्यक्ती आपली सर्व महत्त्वाची कामे स्मार्टफोनद्वारे करतो. मात्र, Smartphone एक मशीन असल्यामुळे यावर अडचणी येणे स्वाभाविक आहे. कधी कधी आपल्या लक्षात येते की, स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे फोन हीटिंगची समस्या उद्भवते. जर ही समस्या वारंवार होत असेल तर, तुमच्या कामात यामुळे व्यत्यय येतो. पण काळजी करण्याची गरज नाही, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला फोन हीटिंगच्या समस्येवरील उपाय सांगणार आहोत.
हे सुद्धा वाचा: लाँचपूर्वी OnePlus 12 आणि OnePlus 12R फोनची किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये येतील का आगामी स्मार्टफोन्स? Tech News
सर्वप्रथम, आपण फोन हीटिंग समस्येची कारणे जाणून घेऊयात. या समस्येमागे पुढीलप्रमाणे अनेक संभाव्य कारणे असू शकतात.
जर तुमच्या फोनची स्क्रीन ब्राइटनेस जास्त असेल तर तुमच्या स्मार्टफोनला जास्त मेहनत करावी लागेल. ज्यामुळे जास्त हिट तयार होते. तसेच स्क्रीन जास्त वेळ चालू ठेवू नका.
तुम्ही तुमचे Apps अपडेट ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. अनेक ऍप्समध्ये बग येतात, जे ऍप डेव्हलपर अपडेट्सद्वारे दुरुस्त करतात. ही अपडेट्स ऍप्स अधिक कार्यक्षम बनवतात, त्यामुळे त्यांना स्मार्टफोनमधून जास्त पॉवरची आवश्यकता नसते.
तुमचे डिव्हाइस चार्ज करण्यासाठी तुम्ही ओरिजनल निर्मात्याने मंजूर केलेला चार्जर वापरणे आवश्यक आहे. लोकल चार्जरद्वारे चार्ज केल्यास फोन हीटिंगची समस्या होते. नेहमी तुमच्या डिव्हाइसच्या गरजेशी सुसंगत असा चार्जर वापरा.
स्मार्टफोनला जास्त वेळ सूर्यप्रकाशात सोडू नका आणि स्वयंपाकघरात नेऊ नका कारण जास्त तापमानामुळे गरम होण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोन जितका वेळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहील, तितकी जास्त उष्णता शोषून घेईल.
लक्षात घ्या की, न वापरलेले ऍप्स खूप उर्जा वापरतात आणि त्यामुळे गरम होऊ शकतात. असे ऍप्स बंद ठेवा आणि Cache वेळोवेळी क्लियर करणे आवश्यक आहे.