Tips For Slow Phone: स्लो चालतोय स्मार्टफोन? ‘या’ खास टिप्ससह सुपरफास्ट होईल तुमचा फोन!

Updated on 21-Jun-2023
HIGHLIGHTS

सर्व महत्त्वाची कामे आपल्या हातात असलेल्या एका छोट्या उपकरणाद्वारे होतात.

स्मार्टफोन आपले सोशल लाईफ ऍक्टिव्ह ठेवतात आणि आपल्याला रोजचे अपडेट देतात.

तुमचा स्मार्टफोनचा स्पीड सुपरफास्ट करण्यासाठी विशेष टिप्स

Tips For Slow Phone: आजकाल आपली जवळपास सर्व महत्त्वाची कामे आपल्या हातात असलेल्या एका छोट्या उपकरणाद्वारे होतात. होय, बरोबर ओळखलंत- आम्ही स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत. स्मार्टफोन आपले सोशल लाईफ ऍक्टिव्ह ठेवतात आणि आपल्याला रोजचे अपडेट देतात. स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपला स्मार्टफोन स्लो व्हायला लागला आहे आणि पूर्वीसारखी कामगिरी करत नाही. अशा परिस्थितीत, या रिपोर्टमध्ये आम्ही काही टिप्स आणले आहेत, ज्याद्वारे तुमचा फोन सुपरफास्ट होईल.

नको असलेल्या गोष्टी रिमूव्ह करा.

फोन सतत वापरल्याने तुमच्या फोनमध्ये भरपूर कॅशे आणि जंक जमा होतो. यात अनेक फोटो, व्हिडिओ आणि ऍप्सचा समावेश आहे. या सर्व गोष्टी तुमचा स्टोरेज घेतात आणि फोन स्लो होतो. यामध्ये जर तुमच्यासाठी महत्त्वाचा कंटेंट नसेल तर ते फोनमधून रिमूव्ह करा.

लाइव्ह वॉलपेपर वापरणे टाळा.

वॉलपेपर आपल्या फोनला एक वेगळा लूक देतात. कधी कधी यासाठी आपण लाइव्ह वॉलपेपर सेट करतो. लाईव्ह वॉलपेपर फोनची बॅटरी वेगाने कमी करतात. तर, फोन परत परत ऑन ऑफ केल्यावर, हे वॉलपेपर वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात, ज्यामुळे फोन स्लो होतो. 

ऍनिमेशन

ऍनिमेशनमुळे आपला फोन फास्ट आणि स्लो होतो आणि यासह फोनचा परफॉर्मन्स चांगला होत नाही. म्हणूनच जर तुम्ही ते कमी केले तर तुमचा फोन आपोआप वेगवान होईल. निवडक फोनमध्ये ऍनिमेशन कमी करण्यासाठी तुम्‍हाला आधी सेटिंग्‍ज आणि नंतर Advanced Features आणि Reduce Animation वर जावे लागेल.

कॅशे क्लियर करा.

तुम्ही सोशल मीडिया जितके जास्त वापरता तेवढे ऍप डेटा कॅशे गोळा करत असतो. हे कॅशे एका वेळी 2GB पर्यंत पोहोचतात. म्हणजेच एकूण 2GB कॅशे तुमच्या डेटामध्ये झाले आहेत. तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन कॅशे क्लियर करू शकता. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :