Tech Tips: तुमची Phone Storage सुद्धा पुन्हा-पुन्हा फूल होते का? Google ची ‘ही’ पद्धत ठरेल उपयुक्त
Android स्मार्टफोनमध्ये स्टोरेज फूल होण्याची समस्या नेहमीच त्रास देत असते.
स्टोरेज फूल होऊ नये म्हणून तुम्ही गॅलरीतील फोटो आणि व्हिडिओ डिलीट करावे लागतात.
फूल स्टोरेजच्या समस्येसाठी Google चे नवीन फीचर तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
जर तुम्ही अधिक काळापासून एकच स्मार्टफोन वापरत असाल तर, तुमच्यासमोर एक मोठी अडचण असते. होय, बऱ्याच Android स्मार्टफोनमध्ये लोकांना सर्वात मोठी समस्या त्रास देत असते, ती म्हणजे त्यांच्या Phone चे स्टोरेज फूल होणे. स्टोरेज फूल होऊ नये म्हणून तुम्ही गॅलरीतील फोटो आणि व्हिडिओ परत परत डिलीट करत असता, पण तरीही फूल स्टोरेजवर त्याचा काही परिणाम होत नाही. जर तुम्हालाही या समस्येचा वारंवार सामना करावा लागत असेल, तर Google चे नवीन फीचर तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
होय, अनेकदा आपण Google Play Store वरून असे ॲप डाउनलोड करतो, जे आपण अजिबात वापरत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? असे ॲप्स जाणूनबुजून किंवा नकळत तुमच्या फोनचे अधिकाधिक स्टोरेज वापरतात. हेच कारण आहे की, तुम्ही कितीही फोटो आणि Video स्मार्टफोनमधून डिलीट केले तरी तुमच्या फोनचे स्टोरेज कमी होत नसते.
फोनची स्टोरेज फूल झाल्यास Google ची उपयुक्त ट्रिक
जर तुम्ही Android स्मार्टफोन यूजर असाल तर Google ची ही ट्रिक तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. या युक्तीद्वारे, तुमच्या फोनवरील भरपूर स्टोरेज बऱ्याच प्रमाणात रिकामी होईल. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्याGooge Play Store वर जावे लागेल आणि त्यानंतर तेथे Automatically Archive Apps चे टॉगल ऑन करावे लागेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रक्रिया-
Automatically Archive Apps द्वारे तुमचे फोन स्टोरेज कसे रिकामे करावे?
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Play Store ओपन करा.
- यानंतर, वरच्या-डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, यातून Settings ऑप्शन सिलेक्ट करा.
- आता तुम्हाला वरच्या बाजूला दिसणाऱ्या General ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा.
- पुढील विंडोमध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील.
- त्यानंतर, Automatically Archive Apps च्या ऑप्शनवर खाली स्क्रोल करा आणि टॉगल करा.
अशाप्रकारे, हे टॉगल ऑन केल्यानंतर तुमच्या फोनमधील तुम्ही अजिबात वापरत नसलेले सर्व विद्यमान ॲप्स संग्रहित केले जातील. ॲप्स संग्रहित केल्यानंतर, तुमच्या फोनचे स्टोरेज आपोआप रिकामे होईल. यानंतर तुम्हाला तुमच्या फोनमधून महत्त्वाचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याची आवश्यकता नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile