How To: Wi-Fi कॉलिंगसह रिचार्जशिवाय तुमच्या जिवलगांशी मनमोकळ्या गप्पा करा, जाणून घ्या ट्रिक
आपल्या फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग नावाची सुविधा उपलब्ध असते.
Wi-Fi कॉलिंग फिचर तुम्हाला Wi-Fi कनेक्शनवर आधारित कॉल करण्यास अनुमती देते.
जाणून घ्या Android आणि iPhone या दोन्ही फोनवर Wi-Fi कॉलिंग सक्रिय करण्याची प्रक्रिया
तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या फोनचे सिम रिचार्ज न करताही तुम्ही मनसोक्त कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. होय, आपणा सर्वांनाच माहिती असेल की, आपल्या फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग नावाची सुविधा उपलब्ध असते. हे फिचर तुम्हाला Wi-Fi कनेक्शनवर आधारित कॉल करण्यास अनुमती देते. सर्व नवीनतम स्मार्टफोन्स आता या फीचर्ससह येतात. अशा परिस्थितीत, तुमच्या फोन नंबरवर रिचार्ज नसेल तरीही तुम्ही या फीचरद्वारे कोणालाही कॉल करू शकता.
Also Read: AI फीचर्ससह सुसज्ज Motorola Edge 50 Pro वर मिळतोय बंपर Discount, बघा Best ऑफर
महत्त्वाचे:
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे Wi-Fi कॉलिंगचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे चांगले Wi-Fi कनेक्शन असणे आवश्यक आहे. Wi-Fi नेटवर्कमध्ये थोडी देखील समस्या आली तर, तुमचे कॉल सहज डिस्कनेक्ट होईल. या फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग सुविधा कशी सक्षम कराल, ते बघुयात-
आम्ही तुम्हाला Android आणि iPhone या दोन्ही फोनवर Wi-Fi कॉलिंग कशी सक्रिय करता येईल. याची स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया सांगणार आहोत:
Android फोनमध्ये Wi-Fi Calling कशी सुरु कराल?
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जावे लागेल.
- यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट या ऑप्शनवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कवर जावे लागेल.
- यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असलेले सिम दिसतील.
- तुम्ही ज्या सिमवरून कॉल करत आहात, त्यावर टॅप करा.
- आता येथे तुम्हाला खाली स्क्रोल करून Wi-Fi कॉलिंगचा ऑप्शन दिसेल.
- यानंतर तुम्हाला Wi-Fi कॉलिंग ऑप्शनचे टॉगल ऑन करावे लागेल.
अशाप्रकारे, Android युजर्स आपल्या मित्रांना, कुटुंबाला Wi-Fi कनेक्शनद्वारे सहज कॉल करण्यास सक्षम असाल.
iPhone मध्ये Wi-Fi कॉलिंग कशी सुरु कराल?
- iPhone मध्ये Wi-Fi कॉलिंगसाठी, तुम्हाला प्रथम Settings मध्ये जावे लागेल.
- यानंतर फोनवर जा. येथे तुम्हाला Wi-Fi कॉलिंगचा पर्याय मिळेल.
- Wi-Fi कॉलिंगचे टॉगल ऑन करून, तुम्ही Wi-Fi कनेक्शनवरून कॉल करण्यास सक्षम असाल.
अशाप्रकारे, iPhone युजर्स आपल्या मित्रांना, कुटुंबाला Wi-Fi कनेक्शनद्वारे फोनमध्ये रिचार्ज नसतानाही सहज कॉल करू शकतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile