Smartphone Tips: तुमच्या Android फोनमध्ये ‘ही’ सेटिंग ताबडतोब ऑन करा, चोरी झाल्यासही होणार नाही स्विच ऑफ 

Smartphone Tips: तुमच्या Android फोनमध्ये ‘ही’ सेटिंग ताबडतोब ऑन करा, चोरी झाल्यासही होणार नाही स्विच ऑफ 
HIGHLIGHTS

तुमचा Smartphone चोरी झाल्यास तो स्विच ऑफ होणार नाही.

लेटेस्ट अँड्रॉइड फोन्स Unlock to power Off नावाच्या फिचरसह येतात.

सिक्योरिटीच्या दृष्टीने 'Unlock to power Off ' फिचर हे अतिशय महत्त्वाचे आहे.

Smartphone Tips: साधरणतः जेव्हा एखादा स्मार्टफोन चोरीला जातो, तेव्हा चोर प्रथम तुमचा स्मार्टफोन बंद करतो. चोरांनी जर एकदा स्मार्टफोन स्विच ऑफ केला तर, तुम्ही तुमच्या फोनचे लोकेशन ट्रॅक करू शकत नाही. मात्र, आताचे स्मार्टफोन बरेच प्रगत झाले आहेत. आता स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी फोनमध्ये असे अनेक फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे तुमच्या फोनची प्रायव्हसीच नाही तर सिक्युरिटीही खूप मजबूत राहते.

Also Read: Important Tips: लॅपटॉपचा Wi-Fi पासवर्ड विसरलात? ‘या’ सोप्या पद्धतीने करा रिकव्हर, बघा प्रक्रिया

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका फीचरबद्दल माहिती देणार आहोत. लेटेस्ट अँड्रॉइड फोन्स Unlock to power Off नावाच्या फिचरसह येतात. नावावरूनच समजले असेल की, हे फिचर कसे कार्य करेल. हे फिचर सक्षम केल्यानंतर, फोन बंद करण्यासाठी तुम्हाला वेगळा पासवर्ड टाकावा लागणार आहे.

Unlock to power Off फिचर

Android स्मार्टफोनमधील सिक्योरिटीच्या दृष्टीने ‘Unlock to power Off ‘ फिचर हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक युजरने हे फिचर आपल्या फोनमध्ये सक्षम करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनलॉक टू पॉवर ऑफ फीचर अंतर्गत जेव्हाही तुम्ही तुमचा फोन बंद कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या फोनचा पासवर्ड टाकावा लागेल. तुम्ही पासवर्ड टाकल्याशिवाय तुमचा फोन बंद करू शकणार नाही.

तुमचा Smartphone चोरी झाल्यासही स्विच ऑफ होणार नाही, फक्त 'ही' सेटिंग ऑन करा

अशा तऱ्हेने तुमचा फोन चोरीला गेल्यास हे फिचर अतिशय उपयुक्त ठरेल. फोन चोराच्या हातात असला तरी तो तुमचा फोन बंद करू शकणार नाही.

Unlock to power Off फिचर सक्षम करण्याची प्रक्रिया

  • Unlock to power Off फिचर सक्षम करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनची सेटिंग्ज ओपन करा.
  • यानंतर, खाली स्क्रोल करा आणि Privacy विभाग ओपन करा.
  • येथे तुम्हाला Unlock to Power Off चा ऑप्शन दिसेल.
  • यानंतर Unlock to Power Off फिचरवर टॉगल करा.
  • हे टॉगल ऑन केल्यानंतर, जेव्हाही तुम्ही फोन बंद कराल, तेव्हा तुम्हाला प्रथम तुमच्या फोनचा पासवर्ड टाकावा लागणार आहे.

तुमचा फोन चोरीला गेल्यानंतर चोराला तो बंद करण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वरील सेटिंग्ज कराव्या लागतील. जर तुम्हालाही तुमचा स्मार्टफोन चोरीला जाण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही लगेचच तुमच्या स्मार्टफोनमधील हे फीचर ऍक्टिव्ह करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo