उत्कृष्ट फोटोग्राफी करण्यासाठी स्मार्टफोन Camera लेन्सची ‘अशा’ प्रकारे काळजी घ्या, बघा Important टिप्स। Tech News
सध्या फोनच्या कॅमेऱ्यात DSLR पेक्षा जास्त पॉवरफुल फीचर्स आणि लेन्स दिले जात आहेत.
तरुणाईच्या मागण्या बघता कंपन्यांनी फोनच्या कॅमेऱ्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
फोनचा कॅमेरा साफ करताना कोणती दक्षता घ्यावी, ते जाणून घ्या.
तरुणाईमध्ये सध्या अनेक ठिकाणी जाऊन त्यांच्या स्मार्टफोनने वेगवेगळ्या प्रकारे फोटोग्राफी करण्याचा छंद खूप वाढला आहे. बाजारात अप्रतिम आणि विशेष बाबींसह सज्ज Camera स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. दरम्यान, अनेक मोठ्या टेक कंपन्या मोबाईल डिझाइन आणि सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल करत आहेत. फोनच्या अनेक क्षमतांमध्ये सुधारणा झाली असताना आणि तरुणाईच्या मागण्या बघता कंपन्यांनी फोनच्या कॅमेऱ्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
हे सुद्धा वाचा: Tips: नवीन Smartwatch खरेदी करायची आहे? या ‘5’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की चेक करा, बघा डिटेल्स। Tech News
मात्र, अनेकदा असे होते की, आपण बाजारात अप्रतिम आणि उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध असलेले कॅमेरा स्मार्टफोन्स घरी घेऊन येतो. परंतु, अवघ्या काही काळातच तुमच्या स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफी करताना तुम्हाला चांगला अनुभव येत नाही. त्याचे कारण म्हणजे स्मार्टफोनच्या कॅमेराची काळजी कशी घ्यावे, याबद्दल अनेक युजर्सना माहिती नसते. चला तर मग या रिपोर्टमध्ये आपण स्मार्टफोन कॅमेरा लेन्सची काळजी कशाप्रकारे घ्यावी, ते बघुयात-
फोनच्या कॅमेराची काळजी कशी घ्यावी?
सध्या फोनच्या कॅमेऱ्यात DSLR पेक्षा जास्त पॉवरफुल फीचर्स आणि लेन्स दिले जात आहेत. फोनचा कॅमेरा देखील ब्राईट आणि क्लियर फोटो काढतो. मात्र, फोनच्या कॅमेऱ्याची लेन्स स्वच्छ असणेही गरजेचे आहे, त्यासाठी फोनचा कॅमेरा व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा फोनचा कॅमेरा त्याची क्षमता गमावतो, त्यामुळे फोनचा कॅमेरा साफ करताना कोणती दक्षता घ्यावी, ते जाणून घ्या.
- स्मार्टफोनचा कॅमेरा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही फोन स्वच्छ ठिकाणी, धूळ आणि घाणीपासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे.
- फोन साफ करताना तो बंद न करण्याची चूक करू नका. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान नको असेल, तर फोन नेहमी ऑफ केल्यानंतर स्वच्छ करा.
- फोनच्या कॅमेरा लेन्सला कोणत्याही स्क्रॅचेसपासून वाचवण्यासाठी मऊ कापडाचा वापर करा. त्याबरोबरच, कॅमेरा गोलाकार हालचालीत स्वच्छ करणे.
- कॅमेरा स्वच्छ करताना क्लिनरने लेन्स साफ करणे महत्वाचे आहे. यामुळे कॅमेऱ्याच्या लेन्सवरील घाण अधिक चांगल्या प्रकारे साफ होईल. तुम्ही सॉफ्ट ब्रशने देखील कॅमेरा लेन्स क्लीन करू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile