How to: फोनवर सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे तुम्ही सुद्धा वैतागलात? ‘अशा’ प्रकारे छोट्याशा सेटिंगद्वारे करा Ads ब्लॉक। Tech News 

How to: फोनवर सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे तुम्ही सुद्धा वैतागलात? ‘अशा’ प्रकारे छोट्याशा सेटिंगद्वारे करा Ads ब्लॉक। Tech News 
HIGHLIGHTS

फोन वापरताना अनेकदा सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे वैताग येतो.

ऍड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये छोटीशी सेटिंग करावी लागेल.

ऍड ब्लॉक करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

फोन वापरताना अशा अनेक समस्या उद्भवतात ज्यामुळे फोन एक्सपेरियन्स खराब होतो. या समस्यांमध्ये नेटवर्कची समस्या आणि वारंवार येणाऱ्या जाहिराती (Ads) समाविष्ट आहेत. एखाद्या वेबसाईटवर काही वाचताना किंवा काम करत असताना मध्येच जाहिराती आल्याने अनेकदा चिडचिड देखील होते. परंतु, आता काळजी करू नका, कारण तुमच्यासोबत असे होऊ नये म्हणून या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला ऍड ब्लॉक करण्याची सोपी प्रक्रिया सांगणार आहोत.

हे सुद्धा वाचा: भारीच की! 50MP कॅमेरासह Samsung Galaxy M14 4G फोन भारतात लाँच, किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

phone user
phone user

‘अशा’प्रकारे ऍड ब्लॉक करा.

  • ऍड ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे, त्यानंतर सर्च बारमध्ये ‘Private DNS’ लिहून सर्च करा.
  • यानंतर प्रायव्हेट DNS वर क्लिक करा आणि प्रायव्हेट DNS प्रोव्हायडर होस्टनेमच्या पर्यायावर क्लिक करा.
  • याच्या खाली तुम्हाला एक ब्लँक स्पेस मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला privatednsadguard.com लिहायचे आहे.
  • त्यानंतर ही कमांड सेव्ह करा. असे केल्यानंतर तुम्हाला जाहिराती दिसणे बंद होतील.

एवढेच नाही तर, तुमच्या फोनमध्ये कमीत कमी थर्ड पार्टी ॲप्स वापरण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा, थर्ड-पार्टी ॲप्समुळे अधिक जाहिराती तुमचा मोबाईल एक्सपेरिअन्स खराब करतात.

how to block ads in android phones

‘या’ प्रक्रियेद्वारे देखील ऍड ब्लॉक करता येतील.

जर वरील प्रक्रियेद्वारे ऍड ब्लॉक होत नसतील तर, तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये पुढीलप्रमाणे सेटिंग करू शकता.

  • सर्वप्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Google वर क्लिक करा. यानंतर ‘मॅनेज युअर गुगल अकाउंट’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • येथे ‘डेटा आणि प्रायव्हसी’ ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर ‘पर्सनलाइज्ड ॲड्स’ वर जा.
  • तुमच्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक केल्या जात आहे ते येथे तुम्ही बघू शकता. यामुळे तुम्हाला ऍड्स शो होतात. गुगल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि सर्चनुसार जाहिराती दाखवतो.
  • ‘Personalized Ads’ नंतर ‘My Ad Center’ ऑप्शनवर क्लिक करा. येथे ‘Personalized Ads’ चा पर्याय दिसेल, तो बंद करा.
  • यानंतर फोनच्या सेटिंग्जमध्ये पुन्हा जा आणि Google वर क्लिक करा आणि ‘Delete Advertising ID’ वर क्लिक करून ते डिलीट करा.

वरील या सेटिंग्ज केल्यानंतर, तुम्हाला फोनवर जाहिराती दिसणे बंद होईल. तुम्ही आनंदाने आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय काहीही करण्यास सक्षम असाल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo