आगामी Honor X9b स्मार्टफोन 15 फेब्रुवारी 2024 रोजी भारतात लाँच होणार आहे. लाँचपूर्वी स्मार्टफोन ब्रँडने या आगामी फोनच्या डिस्प्ले, चिपसेट आणि बॅटरीशी संबंधित सर्व तपशील उघड केला आहे. आता ताज्या लीकमध्ये कंपनीने नवीन डिव्हाइसमध्ये सापडलेल्या कॅमेराचा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर, फोनची किंमतदेखील लाँचपूर्वी लीक झाली आहे. पण लक्षात घ्या की, Honor X9B ची किंमत किंवा विक्री याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट कंपनीकडून देण्यात आले नाही.
हे सुद्धा वाचा: Good News! पुन्हा एकदा Redmi 12 5G स्मार्टफोनच्या किमतीत कपात, पूर्वीपेक्षा फोन आणखी स्वस्तात। Tech News
आत्तापर्यंत समोर आलेल्या लीक आणि रिपोर्ट्समध्ये असे बोलले जात आहे की, Honor X9B स्मार्टफोनची किंमत 28 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन भारतात मिडनाईट ब्लॅक आणि सनशाईन ऑरेंज या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर होऊ शकतो. तसेच, हा आगामी Honor स्मार्टफोन Samsung, Vivo, Realme आणि Oppo सारख्या ब्रँड्सना टक्कर देईल.
Honor India च्या मते Honor X9b स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट चित्रे क्लिक करण्यासाठी 108MP प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. कंपनीचे CEO माधव शेठ यांनी दावा केला आहे की, यात AI पॉवर मोशन सेन्सिंग कॅमेरा लेन्स असेल, जी डिटेल्स इमेज कॅप्चर करेल. त्याची डिझाईन रोलेक्स स्मार्टवॉचने इन्स्पायर्ड असेल. मागील काही अहवालानुसार, , फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर प्रदान केला जाऊ शकतो, परंतु सेल्फी कॅमेराबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही.
याव्यतिरिक्त, Amazon लिस्टिंगनुसार Honor X9B मध्ये कर्व डिस्प्ले असेल. त्याबरोबरच, जलद काम करण्यासाठी मोबाइल फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर, व्हर्च्युअल रॅम, 8GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज आहे. हे उपकरण Android 13 वर आधारित MagicOS 7.2 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. याशिवाय, फोनमध्ये 5800mAh ची मोठी बॅटरी असेल.