लेटेस्ट Honor X9b 5G स्मार्टफोन Powerful स्पेसिफिकेशन्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News
Honor कंपनीने भारतात Honor X9b स्मार्टफोन लाँच केला.
या स्मार्टफोनवर तुम्हाला 3,000 रुपयांची सूट मिळणार आहे.
फोनची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 3 दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.
Htech म्हणजेच Honor ने आज म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी भारतात एक मोठा लाँच इव्हेंट आयोजित केला आहे. या दरम्यान, कंपनीने भारतात Honor X9b स्मार्टफोन लाँच केला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, चीनमध्ये हा स्मार्टफोन आधीच लाँच करण्यात आला आहे. Honor X9b सोबत कंपनीने आज दुपारी 12:30 वाजता Honor Choice Watch, Choice Earbuds X5 हे उपकरणे देखील लाँच केली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Honor X9b 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Important! आता UPI RuPay कार्डद्वारे UAE मध्ये देखील करता येईल पेमेंट, PM मोदींनी केला शुभारंभ। Tech News
Honor X9b 5G ची किंमत
Honor X9B ची किंमत 25,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किंमतीत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनवर तुम्हाला 3,000 रुपयांची सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला 5000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री Amazon India वर 16 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल.
Honor X9b 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Honor X9B स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे. सुरळीत कामकाजासाठी, मोबाइल फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB RAM, व्हर्च्युअल रॅम, 256GB स्टोरेज आणि Adreno A710 GPU आहे.
कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, Honor ने या नवीनतम फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये पहिला 108MP प्रायमरी लेन्स, दुसरा 5MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि तिसरा 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. यासह तुम्हाला नाईट, पोर्ट्रेट, प्रो, पॅनोरमा आणि HDR सारखे फीचर्स मिळतील. या फोनमध्ये 5800mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. हे बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 3 दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.
फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सिक्योरीटीसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील आहे. त्याबरोबरच, कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 5G, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स दिले गेले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile